Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
सुप्रीमच्या आदेशाचे पदाधिकाऱ्यांकडून स्वागत, निवडणुकीमुळे कार्यकर्त्यांना संधी मिळणारअंबाबाई मंदिर विकास आराखडा १४४५ कोटीचा, जोतिबा विकास आरखडयासाठी २५९ कोटीचाबार असोसिएशनमध्ये गटतट न आणता खंडपीठाचा लढा यशस्वी करू – नूतन पदाधिकारी-कार्यकारिणीकडे पदभार सुपूर्दस्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुका चार महिन्यात घ्या, सुप्रीम कोर्टाचा आदेशटॉप वीस शिक्षकांमध्ये पदवीधर शिक्षिका अर्चना सुतार, कविता सरदेसाई !कुशिरेच्या ज्योती चव्हाणचे बारावी परीक्षेत लख्खं यशबारावी परीक्षेत विवेकानंद कॉलेजच्या गुणवत्तेची परंपरा कायमगोखले कॉलेजचा बारावीत विज्ञान शाखेचा निकाल शंभर टक्केप्रशासनाची अॅक्शन, प्रदीप हुपरे निलंबित ! सदाशिव येजरेंचा कबुलीनामा !!शिवाजी विद्यापीठासाठी नव्या कुलगुरू निवडीच्या प्रक्रियेला सुरुवात, शोध समितीसाठी नावांची शिफारस

जाहिरात

 

सावित्रीबाई फुले हॉस्पिटलमध्ये गरजू जोडप्यांसाठी  २४ एप्रिलला आयव्हीएफसंबंधी मोफत सल्ला

schedule22 Apr 25 person by visibility 128 categoryआरोग्य

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : राष्ट्रीय वंध्यत्व निवारण जागरूकता सप्ताह निमित्त कोल्हापूर महानगरपालिका व सिद्धगिरी जननी आयव्हीएफ टेस्ट ट्यूब बेबी सेंटर यांच्या संयुक्त विद्यमानाने गुरुवार दिनांक २४ एप्रिल २०२५ रोजी सावित्रीबाई फुले रुग्णालय येथे शिबिराचे उद्घाटन होणार असल्याची माहिती  सिद्धगिरी जननीच्या प्रमुख डॉ. वर्षा पाटील यांनी दिली.  या शिबिरानंतर प्रत्येक गुरुवारी सावित्रीबाई फुले हॉस्पिटलमध्ये नैसर्गिक प्रसूतीसंबंधी जनजागृती आणि सल्ला शिबिराचे आयोजन केले जाणार आहे.

महापालिकेच्या मुख्य प्रशासक, आयुक्त के मंजूलक्ष्मी म्हणाल्या, “वंधत्व ही समस्या लक्षात घेऊन, २० ते २६ एप्रिल २०२५ दरम्यान राष्ट्रीय प्रजनन जागरूकता सप्ताह साजरा केला जात आहे. या निमित्ताने सिद्धगिरी जननी आयव्हीएफ टेस्ट ट्यूब बेबी सेंटर आणि कोल्हापूर महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने सावित्रीबाई फुले हॉस्पिटल, कोल्हापूर येथे जनजागृती आणि सल्ला शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

या उपक्रमाचा मुख्य हेतू म्हणजे गरजू व आर्थिक दृष्ट्या असक्षम जोडप्यांना योग्य मार्गदर्शन व सल्ला देणे. या शिबिरामध्ये वरिष्ठ सल्लागार डॉ. वर्षा पाटील यांच्याकडून मोफत आयव्हीएफ सल्लामसलत, फक्त २०० रुपयांमध्ये सोनोग्राफीची सुविधा, पुरुष व महिला वंध्यत्वासंबंधी सल्ला दिला जाणार आहे.  विवेक सिद्ध म्हणाले, “संपूर्ण पारदर्शकता, तांत्रिक प्रगती व समर्पित सेवा या तत्त्वांवर सिद्धगिरी जननी कार्यरत आहे. परम पूज्य स्वामीजींच्या आशीर्वादाने हे कार्य अधिक प्रभावीपणे सुरू आहे. या आठवड्यातील शिबिराचा लाभ कोल्हापूर जिल्ह्यातील अधिकाधिक जोडप्यांनी घ्यावा व ही माहिती जनतेपर्यंत पोहोचवावी.”  पत्रकार परिषदेला अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे, सिद्धगिरी जननीच्या अनुराधा शिंदे, अमित गावडे, कुमार चव्हाण, पुनीत मुचंडी, अमोल गराडे उपस्थित होते.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes