Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
साहित्यिक शंकर खंडू पाटील यांच्या जन्मशताब्दीनिमित्त कोल्हापुरात शंकरपट सांस्कृतिक कार्यक्रमडाॅ.दिग्विजय पवार यांचा मलेशियात पुरस्काराने गौरवविजय टिपुगडे यांच्या चित्रांचे तरंगायन प्रदर्शन शनिवारपासूनकोरे अभियांत्रिकीच्या पीबीएल प्रदर्शनात २३००  विद्यार्थ्यांचे ३५० प्रकल्पांचे सादरीकरणचेअरमन झाले, पण फेटा नाही बांधला…! नेत्याच्या आठवणीने राजेश पाटील भावूक ! !खासदार धैर्यशील मानेंनी साजरी केली वाडयावस्तीवरील लोकांसोबत दिवाळीजिल्हा परिषदेच्या शाळेतील तीन मुख्याध्यापक शिक्षण- क्रीडा समितीवर सदस्ययशवंत ब्रिगेड-कोळेकर परिवाराची दिपावलीत सामाजिक बांधिलकी आधार प्रमाणीकरण नसलेले विद्यार्थी संच मान्यतेसाठी ग्राह्य धारावेत – प्रसाद पाटीलगोकुळच्या निवडणुकीत दूध उत्पादकांना मिळावा मतदानाचा अधिकार - राजू माने

जाहिरात

 

विजय टिपुगडे यांच्या चित्रांचे तरंगायन प्रदर्शन शनिवारपासून

schedule12 Nov 26 person by visibility 77 categoryलाइफस्टाइल

महाराष्ट्र न्यूज वन   ः  चित्रकार विजय टिपुगडे यांच्या निसर्गचित्रांच्या ‘तरंगायन' प्रदर्शनाला शनिवार (ता.१४) पासून प्रारंभ होणार आहे. दसरा चौकातील राजर्षी शाहू स्मारक भवनातील मोठ्या कलादालनात प्रदर्शन होत असून दोनशेहून अधिक कलाकृतींचा प्रदर्शनात समावेश आहे. 
दरम्यान, शनिवारी (ता.१४) सकाळी अकरा वाजता खासदार धनंजय महाडिक, आमदार अमल महाडिक, माजी आमदार मालोजीराजे छत्रपती, मधुरिमाराजे छत्रपती, सत्यजित कदम, पुष्कराज क्षीरसागर, डॉ. सुरज पवार, डॉ. रेश्मा पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत उदघाटन होईल. 
चित्रकलेच्या इतिहासात निसर्ग हा प्राचीन काळापासून चित्रकारांच्या अभिव्यक्तीचा महत्त्वाचा विषय राहिला आहे. निसर्गचित्रणाच्या परंपरेला आपल्या वास्तववादी शैलीतून वेगळे रूप देणारे चित्रकार म्हणून  टिपुगडे यांची ओळख आहे. 
‘तरंगायन’ म्हणजे तीन दशकांपासून कलेला पूर्णपणे समर्पित असलेल्या एका सच्च्या कलावंताचा सृजनशील प्रवाह आहे. ज्याप्रमाणे एखादी लाट आपला वेग आणि प्रवाह कायम ठेवत किनाऱ्याच्या रचनेनुसार नवे आकार धारण करते आणि आपले ध्येय गाठते, त्याचप्रमाणे श्री. टिपुगडे यांचा कलाप्रवासही एका कलामाध्यमातून दुसऱ्या माध्यमाकडे सातत्याने प्रवाहित होत राहिला आहे. ‘कामातील बदल हीच खरी विश्रांती’ हे तत्त्व आत्मसात करून त्यांनी केवळ चित्रकार म्हणून नव्हे, तर कलाशिक्षक, रंगावलीकार, सामाजिक कार्यकर्ता, छायाचित्रकार आणि स्तंभलेखक अशा विविध भूमिका नेटाने बजावल्या आहेत. तब्बल १२ वर्षांनंतर त्यांचे वैयक्तिक निसर्गचित्र प्रदर्शन रसिकांच्या भेटीला येत आहे. या प्रदर्शनात जलरंग आणि ॲक्रेलिक या माध्यमांतील कलाकृती असून कोल्हापूरच्या निसर्गरूपाचे, परिसरातील दृश्यवैभवाचे आणि निसर्गातील सूक्ष्म बारकाव्यांचे वास्तववादी शैलीतील चित्रण अनुभवता येणार आहे. सकाळी दहा ते रात्री आठ या वेळेत प्रदर्शन सर्वांसाठी खुले राहणार आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes