वारणानगर इंजिनीअर अँड टेक्नॉलॉजीचा माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा उत्साहात
schedule25 Jul 25 person by visibility 51 categoryशैक्षणिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : तात्यासाहेब कोरे इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनीअरिंग अँड टेक्नॉलॉजी (ऑटोनॉमस) वारणानगर यांच्या पुणे पिंपरी-चिंचवड परिसरातील माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा उत्साहात पार पडला. “आठवणी, आपुलकी आणि प्रेरणेचा एक अविस्मरणीय सोहळा!” अशी या स्नेहमेळाव्याची संकल्पना होती. या मेळाव्यास शंभरहून अधिक विद्यार्थ्यांनी उपस्थिती लावली. या विशेष कार्यक्रमात पद्मश्री डॉ. जी. डी. यादव यांची प्रमुख उपस्थिती होती. त्यांनी नवकल्पनांचा शोध घेण्याचे आवाहन करत विद्यार्थ्यांशी प्रेरणादायी संवाद साधला. विज्ञान एक्सचे राष्ट्रीय उपक्रमाचे समन्वयक आणि 'संकल्प सेमीकंडक्टर'चे संस्थापक विवेक जी. पवार यांनी भारतातील सेमीकंडक्टर क्रांतीवर प्रभावी मार्गदर्शन केले. मेळाव्यास श्री वारणा विविध उद्योग व शिक्षण समूहाचे अध्यक्ष, आमदार, डॉ. विनय कोरे यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधला. श्री वारणा विभाग शिक्षण मंडळांचे, मुख्य कार्यकारी अधिकारीविलास. व्ही. कार्जिनी, अधिष्ठाता, डॉ. एस.एम.पिसे, प्राचार्य, डॉ. डी. एन. माने, माजी विद्यार्थी समिती समन्वयक, प्रा. बी. आर बागणे उपस्थित होते. नितीन भट्टड आणि पल्लवी तावरे यांनी आभार मानले. स्नेहमेळाव्याच्या यशस्वितेसाठी सत्यजीत भोसले, तानाजी पोळ, पल्लवी मुखर्जी, तुषार पाटील, विद्यानंद गावडे, सचिन गाडे, संतोष रक्तवान, विपुल पाटील, अजय तारीबागील यांनी परिश्रम घेतले.