Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
सचिन शिरगावकर, बेस्ट इंजिनीअर ऑफ द इयर !जातीवंत म्हैस खरेदीसाठी गोकुळच्या अनुदानात वाढ ! सचिवांचे कमिशन वाढविलेसोमवारी लोकरंग पुरस्कार वितरण समारंभहॉटेल नागरी पतसंस्थेच्या अध्यक्षपदी सिद्धार्थ लाटकर, उपाध्यक्षपदी मोहन पाटीलराधानगरी धरणाचे दोन दरवाजे उघडलेड्रेनेज घोटाळयातील दोषींवर फौजदारीसह प्रशासकीय कारवाई होणार-आयुक्त के मंजुलक्ष्मी शिक्षण विभाग करणार शाळांची अचानक तपासणी ! तर मुख्याध्यापकांवर कारवाई !!वारणानगर इंजिनीअर अँड टेक्नॉलॉजीचा माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा उत्साहातअल्पवयीन मुलांची कार स्टंटबाजी विद्यार्थिनीच्या जीवावर, चारचाकीच्या धडकेत कौलव येथील प्रज्ञा कांबळेचा मृत्यूकाँग्रेस फुंकणार शनिवारी महापालिका निवडणुकीचे रणशिंग, माजी नगरसेवकासह कार्यकर्त्यांचा मेळावा

जाहिरात

 

काँग्रेस फुंकणार शनिवारी महापालिका निवडणुकीचे रणशिंग, माजी नगरसेवकासह कार्यकर्त्यांचा मेळावा

schedule24 Jul 25 person by visibility 72 categoryमहानगरपालिका

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीचे पडघम वाजू लागले असून काँग्रेसने येत्या शनिवारी महानगपालिका क्षेत्रातील माजी नगरसेवक, पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा मेळावा कोल्हापूर जिल्हा काँग्रेस कमिटीत आयोजित केली आहे. सायंकाळी पाच वाजता होणाऱ्या या बैठकीत खासदार शाहू छत्रपती, काँग्रेसचे विधानपरिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील मार्गदर्शन करणार आहेत. या बैठकीला आमदार जयंत आसगावकर, माजी आमदार मालोजीराजे, माजी आमदार ऋतुराज पाटील प्रमुख उपस्थित राहणार आहेत. काँग्रेसने महापालिका निवडणुकीची तयारी सुरु केली असून त्यादृष्टीने प्रत्येक प्रभाग निहाय आढावा घेतला जाणार आहे. येणाऱ्या मनपा निवडणुकीत पुनर्रचना व प्रभागांची संख्या वाढणार  असल्याने त्यादृष्टीनेही या बैठकीत चर्चा केली जाणार आहे. या बैठकीला माजी नगरसेवक, आजी-माजी पदाधिकारी व काँग्रेस कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावे असे आवाहन काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन चव्हाण यांनी केले आहे.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes