Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
राज्यातील पंचवीस बड्या पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या ! सुनील फुलारींची ठाण्यात बदली, रंजन शर्मा कोल्हापूरचे नवे आयजी!!ङङ थथथऋतूपूर्ण - प्रियांका कांबळे विवाह सोहळा थाटातसन्मान वारशाचा - पुनर्भेट नात्यांची ! केआयटीच्या प्रगतीसाठी दिल्लीत एकवटले माजी विद्यार्थी !!इंधन बचतीचा फंडा…जिप अध्यक्षांचा प्रवास बसमधून, उपाध्यक्ष - सभापती ई बाईकवरुन ! अधिकारी सायकलवर!!नोटिसा काढून अतिक्रमणधारकांना संरक्षण - माजी नगरसेवक संघटनेचा आरोपजिल्हा परिषदेत छत्रपती संभाजी महाराजांची जयंती उत्साहात साजरीवंचित मुलांना मॉलची सफर, सरकत्या जिन्याचा आनंद, सिनेमाच्या दुनियेची सैर अन् मनोरंजनाची मेजवाणीआयएएस प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांची गोकुळ दूध संघाला भेटडॉ. संजय डी. पाटील यांचा द कॅप्टन्स व्हिजन अवॉर्डने सन्मान

जाहिरात

 

जिल्हा परिषदेतर्फे दर शुक्रवारी सायकल डे, पदाधिकारीही करणार बसने प्रवास

schedule13 May 26 person by visibility 217 categoryजिल्हा परिषद

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंधन बचतीच्या केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत कोल्हापूर जिल्हा परिषदेने दर शुक्रवारी सायकल डे उपक्रम राबविण्याचा निर्णय घेतला आहे. या उपक्रमात पदाधिकारी सहभागी होणार आहेत.  ज्यांना शक्य आहे, त्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सायकल, सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेतंर्गत बसेसचा वापर करावा असे आवाहन जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शिल्पा खोत यांनी केले आहे. जे अधिकारी, कर्मचारी कार्यालयापासून जवळच्या अंतरावर आहेत, त्यांनी चालत कार्यालयात यावे असे आवाहनही त्यांनी केले आहे. प्रत्येक शुक्रवारी हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. जिल्हा परिषद, पंचायत समितीकडील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी यामध्ये सहभागी व्हावे .जिल्हा परिषदेकडील सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांनी या उपक्रमात सहभाग नोंदवावा. जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या पदाधिकाऱ्यांनीही बस व सायकलींचा वापर करावा. असे आवाहन अध्यक्षा खोत यांनी केले आहे. पंतप्रधान मोदी यांनी नुकतेच देशवासियांना उद्देशून भाषण करताना काटकसरीचे आवाहन केले आहे. इंधन बचतीचा संदेश देताना पेट्रोल व डिझेलचा कमीत कमी वापर करावा असे आवाहन मोदी यांनी केले आहे. त्या आवाहनाला प्रतिसाद देत जिल्हा परिषदेने दर शुक्रवारी सायकल, बस अथवा चालत कार्यालयात येण्याचा उपक्रम राबविण्याचे आवाहन केले आहे.

…………………………………………….

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes