लातूर-नांदेड परिसरात गोकुळचा विस्ताराचा प्रयत्न, मराठवाडयात दुग्धजन्य उत्पादने उपलब्ध करणार
schedule07 Aug 25 person by visibility 251 categoryउद्योग

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : ‘राज्यातील मुंबई-पुणे परिसरासह मराठवाडा विभागातूनही गोकुळच्या दूध व दुग्धजन्य पदार्थांना मोठ्या प्रमाणावर मागणी वाढत आहे. या पार्श्वभूमीवर, गोकुळ दूध संघाच्या व्यवस्थापनाने लातूर आणि नांदेड परिसरातील स्थानिक दूध संघांची भेट घेऊन प्रत्यक्ष आढावा घेतला. सहकार मंत्री व उजना मिल्कचे चेअरमन बाबासाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु असलेल्या उजना मिल्क या दूध संघाच्या माध्यमातून गोकुळचे दूध व दुग्धजन्य पदार्थ या भागांमध्ये उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने सकारात्मक चर्चा झाली असून, लवकरच या विभागांतही गोकुळचे दूध व दर्जेदार उत्पादने ग्राहकांपर्यंत पोहोचविण्यासाठी ठोस पावले उचलली जाणार आहेत.’असे गोकुळचे चेअरमन नविद मुश्रीफ यांनी सांगितले.
कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाचे नविद मुश्रीफ व संचालक यांची मराठवाड्यातील उजना मिल्क प्रोडक्टस् प्रायव्हेट सुनेगाव (सांगवी) दूध संघास बुधवारी भेट दिली. या भेटीदरम्यान अहमदपूरचे माजी आमदार बाळासाहेब जाधव आणि अविनाश जाधव यांनी गोकुळचे चेअरमन मुश्रीफ व संचालकांचा सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी दूध संकलन प्रक्रियेची सखोल माहिती डेअरीचे मॅनेजर संदीप पाटील यांनी दिली. याप्रसंगी गोकुळचे संचालक युवराज पाटील, शशिकांत पाटील चुयेकर, प्रा. किसन चौगले, बिद्री साखर कारखान्याचे व्हाइस चेअरमन मनोज फराकटे, अविनाश जाधव, सुरज पाटील, संचालक डेअरी व्यवस्थापक अनिल चौधरी, वरिष्ठ दूध संकलन अधिकारी सर्जेराव पाटील व मार्केटिंग अधिकारी शिवाजी चौगले उपस्थित होते.