Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
विद्यापीठामध्ये राजकीय अड्डा करू नका ! शिवसेना युवासेना - मनसेचा अभाविपच्या कार्यक्रमावर आक्षेप ! !डी. वाय. पाटील यांच्या स्मृतींना अभिवादन करण्यासाठी शनिवारी सर्वपक्षीय शोकसभातात्यासाहेब कोरे फार्मसी कॉलेजच्या बी फार्म अभ्यासक्रमास अ मानांकनहुतात्मा क्रांती सामाजिक संस्थेतर्फे आठ ऑगस्टला क्रांतिज्योत मिरवणूक डी.वाय.दादांचं मोठेपण अधोरेखित करणारी 'ती'...अमर रहे -अमर रहे, डी. वायदादा अमर रहे ! ज्ञानसुर्याला अखेर निरोप देण्यासाठी जनसागर लोटला !!करवीर तालुका शिक्षक - शिक्षकेतर पतसंस्थेच्या चेअरमनपदी धोंडीराम पाटील, व्हाइस चेअरमनपदी निता ठाणेकरभारतीय मजदूर संघाच्या मागण्यासंबंधी लवकरच उच्चस्तरीय बैठक, मुख्यमंत्र्यांची ग्वाहीक्रांतिसिंह नाना पाटील यांच्या जीवनावर आधारित ‘पत्री सरकार १९४२’ चित्रपटाचे टिझर प्रदर्शितहॅलो… मी, डी.वाय. पाटील बोलतोय ! !

जाहिरात

 

डॉ. सुनेत्रा शिराळे यांना आरोग्य विद्यापीठाची पीएचडी

schedule28 May 26 person by visibility 271 categoryआरोग्य

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : प्रथितयश होमिओपॅथ डॉ. सुनेत्रा देशभूषण शिराळे यांना महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ अंतर्गत मेडीसीन विषयात पीएचडी  केली. जुलै २०२६ मध्ये नाशिक येथे होणाऱ्या महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या दिक्षांत समारंभात त्यांना पदवी प्रदान करण्यात येणार आहे. आरोग्य विद्यापीठातून होमिओपॅथी विद्याशाखेमध्ये पीएच.डी. प्राप्त करणाऱ्या त्या पश्चिम महाराष्ट्रातील पहिल्या होमिओपॅथिक तज्ञ आहेत.

जगद्‌गुरू पंचाचार्य एज्युकेशन सोसायटीच्या होमिओपॅथिक वैद्यकिय महाविद्यालय व रुग्णालय कोल्हापूर या आरोग्य विद्यापीठ मान्यता प्राप्त संशोधन केंद्रामधून प्रा. डॉ. सुजाता कामिरे यांच्या मार्गदर्शनाखाली "इफेक्टीव्हनेस ऑफ होमिओपॅथीकमेडीसीन इन द मॅनेजमेंट ऑफ अँक्यूट हायनायटीस" या विषयावर डॉ. शिराळे यांनी शोध निबंध सादर केला. तसेच त्यांचे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय नियतकालीकांमधून संशोधनपर लेख देखील प्रसिध्द झाले आहेत.संशोधन कार्यात त्यांना आरोग्य विद्यापीठाच्या होमिओपॅथी विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. राजकुमार पाटील, महाविद्यालयातील मेडीसीन विभागाचे प्राध्यापक डॉ. सचिन मगदूम, डॉ. शिवानी पाटील यांचे  सहकार्य लाभले.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes