Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
महायुतीत एकमत होईना, उमेदवारांची घोषणा गुरुवारीचपुणे शिक्षक मतदारसंघासाठी ६७ अर्ज ! ४० हून अधिक उमेदवार !!माळी समाजाच्या घरगुती गणेश सजावट, झिम्मा फुगडी स्पर्धेला प्रतिसाद, बक्षीस समारंभ उत्साहातशक्तीप्रदर्शन करत भैया मानेंनी भरला उमेदवारी अर्ज, सर्वसामान्य पदवीधर हाच माझा पक्ष !महाविकास आघाडीचे शक्तीप्रदर्शन, शिक्षकमधून जयंत आसगावकर, पदवीधरसाठी हर्षदा देशमुखांचा अर्ज ! नेतेमंडळीची उपस्थितीत जाहीरनामा प्रकाशित!!अकॅडमी रिसर्च इंडेक्समध्ये डॉ. सी. डी. लोखंडे देशात पहिल्यास्थानी ! डॉ. प्रमोद एस. पाटील तिसऱ्यास्थानी !! मंगेश चिवटेंनी भरला शिक्षक मतदारसंघात अर्ज, शिवसेनेचे मंत्री - आमदारांची उपस्थितीगोकुळसाठी समविचारी आघाडीचे पॅनेल बुधवारी जाहीर करणार - सतेज पाटीलगोकुळसाठी आश्वासक चेहरा, चेअरमनपदाच्या कालावधीत दाखविली धडाडीभाजपची पुण्यातून घोषणा, एकनाथ शिंदे दिल्लीत - शिवसेनेकडून मंगेश चिवटेंना एबी फॉर्म ! मंगळवारी भैया मानेंचे अर्ज भरताना शक्तीप्रदर्शन ! !

जाहिरात

 

माळी समाजाच्या घरगुती गणेश सजावट, झिम्मा फुगडी स्पर्धेला प्रतिसाद, बक्षीस समारंभ उत्साहात

schedule06 Oct 26 person by visibility 49 categoryसामाजिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी : लिंगायत माळी समाज कोल्हापूर जिल्हा संघटनेच्यावतीने घरगुती गणेश देखावा स्पर्धा तसेच  महिला मंडळातर्फे आयोजित झिम्मा फुगडी स्पर्धेला उस्फुर्त प्रतिसाद मिळाला. विजेत्यांना बक्षीस देऊन सत्कार करण्यात आला. अक्कमहादेवी मंटप येथे स्पर्धा व बक्षीस वितरण समारंभ झाला.

 या स्पर्धेतील विजेत्यांचा, माजी महापौर व नगरसेविका  स्वाती येवलुजे, काँग्रेसच्या महिला सरचिटणीस भारती पोवार  नगरसेविका दिपाली घाटगे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. दरम्यान याचवेळी लिंगायत माळी समाज कोल्हापूर जिल्हा संघटनेच्या वतीने आयोजित केलेल्या गणेशोत्सव स्पर्धेचा बक्षीस समारंभ ही पार पडला. 

घरगुती गणेशोत्सव स्पर्धेत नागाव येथील जयदीप यादव प्रथम कसबा बावडा येथील सम्राट दिलीप माळी द्वितीय पाचगाव येथील अमोल कुमार म्हेत्रे तृतीय क्रमांक मिळवला.  झिम्मा फुगडी स्पर्धेत  कुंभोज येथील अक्कमहादेवी महिला मंडळाने प्रथम कसबा सांगाव  येथील संत सावता महिला मंडळाने द्वितीय तर बालिंगा येथील हिरकणी महिला मंडळाने तृतीय क्रमांक पटकावला. उत्तेजनार्थ हुपरी  येथील हिरकणी महिला मंडळाला मिळाला. 

महिला मंडळाचे अध्यक्ष वंदना माळी यांनी प्रास्ताविक केले. कार्याध्यक्ष विद्या माळी यांनी स्वागत केले. यावेळी आदर्श सासू - सून पुरस्कार नर्मदा नारायण  पाटील, सुप्रिया बालाजी पाटील, स्मिता रमेश पाटील  यांना तर आदर्श पती-पत्नी पुरस्कार रुपाली माळी, विजय माळी यांना देण्यात आला. या कार्यक्रमास नेहा अभिजीत माळी, लिंगायत माळी समाज कोल्हापूर जिल्हा संघटनेचे अध्यक्ष  गुरुबाळ माळी, कार्याध्यक्ष   संतोष माळी, संचालक राजाराम माळी,   माजी अध्यक्ष  अशोक माळी, महिला संघटनेच्या सचिव श्रुती कुलगुडे, मार्गदर्शक मीनाक्षी माळी, साधना माळी, शीला गोंधळी, निर्मला माळी, रुपाली सचिन माळी, इंद्रायणी चौगुले, भाग्यश्री माळी, वनिता माळी, नम्रता सुतार, ऋतुजा अजय माळी उपस्थित होते.  संतोष माळी यांनी सूत्रसंचालन केले. उपाध्यक्षा वैशाली माळी यांनी आभार मानले.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes