शक्तीप्रदर्शन करत भैया मानेंनी भरला उमेदवारी अर्ज, सर्वसामान्य पदवीधर हाच माझा पक्ष !
schedule06 Oct 26 person by visibility 90 categoryराजकीय
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी : पुणे पदवीधर मतदारसंघासाठी कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक भैय्या माने यांनी अपक्ष म्हणून मंगळवारी, उमेदवारी अर्ज दाखल केला. माने यांनी शक्तीप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज भरला. ‘कोल्हापूर, सांगली, सातारा सोलापूर आणि पुणे या चार जिल्ह्यांमध्ये पदवीधर मतदारांच्या नोंदणीच्या प्रक्रियेत गेल्या पंधरा वर्षांपासून सक्रियपणे काम करत असल्याचा दावा भैय्या माने यांनी केला. पदवीधरांची नोंदणी, त्यांच्या प्रश्नांसाठी केलेले काम आणि सातत्याने पदवीधरांशी असलेला संपर्क हीच आपली राजकीय ताकत आहे. सर्वसामान्य पदवीधर हाच माझा पक्ष आहे.’असे माने यांनी सांगितले.
दरम्यान, महायुतीकडून आपल्याला किंवा शरद लाड यांना उमेदवारी मिळेल, अशी अपेक्षा होती, असे भैय्या माने यांनी सांगितले. मात्र अचानक नवीन नाव पुढे आल्याने आपण आश्चर्यचकित झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले. शरद लाड यांना अचानक उमेदवारीपासून डावलले जाणे, प्रवेश करूनही त्यांना संधी न मिळणे हे त्यांच्यासाठी निश्चितच धक्कादायक आहे.आपली भूमिका सध्या अपक्षाची असली तरी पक्षातील वरिष्ठ नेत्यांकडून आपल्याबद्दल सकारात्मक भूमिका असल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी त्यांनी दिवंगत नेत्यांच्या आठवणींना उजाळा देत भावनिक भाष्य केले. अर्ज दाखल करत असताना “ दादांच्या मनातील आमदार “ हे फलक लक्षवेधी ठरत होते