Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
मुश्रीफसाहेब मला खाणार आहेत की ? मी त्यांना खाणार आहे ? आमदार शिवाजी पाटलांचे धडाकेबाज विधानमहायुतीच्या उमेदवारांची यादी गुरुवारी दहा वाजता जाहीर होणार, मंत्री मुश्रीफ करणार नावांचे ट्विटगोकुळसाठी महायुतीच्या घडामोडी वेगावल्या, तीन मंत्री -खासदार- आमदारांची उपस्थिती ! आमदार शिवाजी पाटील ही बैठकीला!!चचणडडदिल्लीतील सौंदर्य विषयक परिषदेत डॉ. उद्धव पाटील यांचे मार्गदर्शन कोल्हापुरात भाजपातर्फे ज्योती यात्रा उत्साहात, शहरातून मोटरसायकल रॅलीवंचितांच्या सिनेमावर सखोल अभ्यास आवश्यक : मेघराज राजेभोसलेमहायुतीत एकमत होईना, उमेदवारांची घोषणा गुरुवारीचपुणे शिक्षक मतदारसंघासाठी ६७ अर्ज ! ४० हून अधिक उमेदवार !!माळी समाजाच्या घरगुती गणेश सजावट, झिम्मा फुगडी स्पर्धेला प्रतिसाद, बक्षीस समारंभ उत्साहात

जाहिरात

 

अकॅडमी रिसर्च इंडेक्समध्ये डॉ. सी. डी. लोखंडे देशात पहिल्यास्थानी ! डॉ. प्रमोद एस. पाटील तिसऱ्यास्थानी !!

schedule06 Oct 26 person by visibility 102 categoryशैक्षणिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : शैक्षणिक संशोधन निर्देशांकातर्फे जाहीर करण्यात आलेल्या २०२६ च्या जागतिक 'टॉप १००० संशोधक' क्रमवारीत  डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाच्या सेंटर फॉर इंटर डिसिप्लिन रिसर्चच्या ७ संशोधकांनी जागतिक यादीत मानाचे स्थान पटकावले आहे. 'एनर्जी मटेरियल्स अँड डिव्हाइसेस' या विषयात डॉ सी. डी. लोखंडे यांनी जागतिक क्रमवारीत २२ वे, तर देशात प्रथम स्थान पटकावले. त्यांचा प्रभाव गुणांक  ९९.३८ असून ते जगातील अव्वल ०.२१% संशोधकांमध्ये समाविष्ट झाले आहेत.  संशोधन संचालक  प्रा. डॉ. प्रमोद एस. पाटील यांनी जगात २४ वे तर देशात तिसरे स्थान मिळवले आहे. त्यांचा प्रभाव गुणांक ९७.८९ असून ते जगातील सर्वोच्च ०.४७% संशोधकांमध्ये स्थान मिळवून आहेत.

डॉ. उमाकांत एम. पाटील यांनी ७६ वे स्थान मिळवले असून  डॉ. विश्वजीत एम. खोत (३२७), डॉ. जयवंत एल. गुंजकर (५५२), डॉ. अर्पिता तिवारी (५९४), डॉ. पी. पी. पवार  (६११) यांनी  जागतिक क्रमवारीत स्थान प्राप्त केले. २०२१-२०२५ या प्रभाव कालावधीसाठी जाहीर झालेल्या या क्रमवारीत  'एनर्जी मटेरियल्स अँड डिव्हाइसेस' या संशोधन डॉ सी. डी. लोखंडे यांनी जागतिक स्तरावर २२ वा क्रमांक मिळवला आहे. विशेष म्हणजे, या विषयात भारतातून त्यांनी प्रथम क्रमांक पटकावला आहे.

डॉ. उमाकांत एम. पाटील यांनीही याच विषयात त्यांनी ७६ वे जागतिक स्थान पटकावले असून भारतात ८ वे स्थान मिळवले आहे. त्यांचा प्रभाव गुणांक ९४.२६ आहे.  डॉ. विश्वजीत एम. खोत यांनी 'मॅग्नेटिक नॅनोपार्टिकल्सचे कॅरेक्टरायझेशन आणि ॲप्लिकेशन्स' या क्षेत्रात जागतिक क्रमवारीत ३२७ वे तर भारतामध्ये ११ वे स्थान मिळवले आहे. त्यांचा प्रभाव गुणांक ९५.२३ असून ते जगातील टॉप १.७% संशोधकांत समावेश आहे. डॉ. जयवंत एल. गुंजकर यांनी 'लेअर्ड डबल हायड्रॉक्साइड्स सिंथेसिस अँड ॲप्लिकेशन्स' या विषयात ५५२ वे जागतिक स्थान मिळवले असून भारतात २० वा क्रमांक मिळवला आहे. त्यांचा प्रभाव गुणांक ९२.८२ आहे.

 डॉ. अर्पिता तिवारी यांनी  ' कार्बन अँड क्वांटम डॉट्स ॲप्लिकेशन्स' या विषयामध्ये  जागतिक स्तरावर ५९४ वे तर भारतात ५५ वे स्थान संपादन केले आहे. त्यांचा प्रभाव गुणांक ८८.१९ आहे. डॉ. प्रवीण. पी. पवार यांनी 'रेडिएशन शिल्डिंग मटेरियल्स ॲनालिसिस' या विषयात ६११ वे जागतिक स्थान मिळवले असून देशात ७५ वा क्रमांक मिळवला आहे. त्यांचा प्रभाव गुणांक ८२.९१ आहे. जागतिक क्रमवारीत स्थान मिळवणाऱ्या या सर्व संशोधकांचे विद्यापीठाचे कुलपती डॉ. संजय डी. पाटील यांच्याहस्ते सन्मानित केले. यावेळी विश्वस्त पृथ्वीराज पाटील, सौ. वृषाली पृथ्वीराज पाटील, कुलगुरू डॉ. राकेश कुमार शर्मा, कुलसचिव डॉ. व्ही. व्ही. भोसले आदी उपस्थित होते. 
 

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes