Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
केएमटी कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाच्या धर्तीवर सुधारित वेतनश्रेणी ! नगरविकासचा आदेश !!तिरुपती बालाजी येथे महाराष्ट्र सदन स्थापन करा, राजेश क्षीरसागरांची मुख्यमंत्र्यांच्याकडे मागणीबदली टप्पा क्रमांक सहामधील शिक्षकांना शाळांचा प्राधान्यक्रम नोंदविण्याची सुविधा २१ ऑगस्टपासून कोल्हापुरात  बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजनसहाय्यक प्राध्यापक- शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या भरतीबाबत लवकरच प्रक्रिया-मंत्री चंद्रकांत पाटील न्यू वूमेन्स कॉलेज ऑफ फार्मसीमध्ये नेत्ररोग तपासणी शिबिरकोल्हापुरात 19 ऑगस्ट रोजी राज्यस्तरीय वीज परिषद, वीज दरवाढीच्या विरोधात ठरणार आंदोलनाची दिशाकॉमर्स कॉलेजमध्ये डॉ. रंगनाथन यांची जयंती साजरीगोकुळ करणार आईस्क्रिम अन् चीज निर्मिती ! गडहिंग्लजला उभारणार म्हैस विक्री केंद्र !!शिक्षक संघ थोरात गटाची कोल्हापूर शहर कार्यकारिणीची घोषणा

जाहिरात

 

महिलांच्या सक्षमीकरणासाठी वर्षभरात दहा हजार ई-रिक्षांचे वितरण-मंत्री आदिती तटकरे

schedule08 Aug 25 person by visibility 113 categoryजिल्हा परिषद

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर ‘महिलांना अधिक सक्षम बनवण्यासाठी महिला व बालविकास विभागाच्यावतीने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना व पिंक ई - रिक्षा या दोन महत्त्वाकांक्षी योजना राबविण्यात येत आहेत. पिंक ई रिक्षा ही चार्जिंगवर चालणार असून महिलांच्या सुरक्षिततेसाठी जीपीएस सिस्टीमसह रिक्षात बसलेल्या व्यक्तीचे छायाचित्र काढण्याची सुविधा यात देण्यात आली आहे. राज्यात यावर्षी १० हजार ई रिक्षा वितरीत करण्यात येणार आहेत. यासाठी प्राप्त झालेल्या ७०० अर्जांपैकी ४०० महिला लाभार्थी पिंक रिक्षा साठी कोल्हापूर शहरात पात्र ठरल्या आहेत. येत्या काळात विमानतळ, पर्यटन स्थळे अशा ठिकाणीही पिंक ई रिक्षाचा वापर होण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. ’असे महिला व बालविकासमंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले.

महिला - बाल विकास विभाग व  कायनेटिक ग्रीन यांच्या संयुक्त विद्यमाने महासैनिक दरबार हॉल पिंक ई रिक्षा व रुपे कार्डचे वितरण करण्यात आले. पालकमंत्री प्रकाश आबिटकर,  खासदार शाहू महाराज छत्रपती, माजी आमदार राजेश पाटील, महिला व बाल विकास विभागाच्या आयुक्त नयना गुंडे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस., कायनेटिक कंपनीचे विक्री विभागाचे उपाध्यक्ष जोयेल जॉर्ज, फायनान्स विभागाचे उपाध्यक्ष अग्रदीप रॉय, माजी आमदार राजेश पाटील, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब पाटील आसुर्लेकर,  शहराध्यक्ष आदिल फरास यांच्या उपस्थितीमध्ये कार्यक्रम झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ होते. पालकमंत्री आबिटकर म्हणाले, ‘महिलांची उन्नती साधत त्यांना सामाजिक प्रतिष्ठा मिळवून देण्यासाठी पिंक ई - रिक्षा योजनेच्या धर्तीवर  महिला व बालविकास विभागाच्या योजना अधिक आधुनिक व नाविन्यपूर्ण पद्धतीने राबवणे आवश्यक आहे. याच दृष्टीने महिलांच्या विकासाबरोबरच त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी जिल्हा वार्षिक योजनेतील तीन टक्के निधीतून महिलांच्या नाविन्यपूर्ण उद्योग निर्मितीला चालना देण्याबाबत निर्णय घेण्यात येईल.’

मंत्री मुश्रीफ म्हणाले, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसह महिला कल्याणसाठीच्या सर्व योजना भविष्यातही सुरु राहतील. येत्या निवडणुकीतही महिलांनी महायुतीच्या उमेदवारांना निवडून द्यावे, लाडकी बहिण योजनेंतर्गत २१०० रुपये देऊ.खासदार शाहू महाराज छत्रपती म्हणाले, महिलांनी एकत्र येऊन कार्य केल्यास त्यातून चांगला परिणाम घडतो. प्रदूषण मुक्त ई रिक्षा असल्यामुळे प्रदूषण रोखले जाईल. कोल्हापूर जिल्ह्यात या योजनेला चांगला प्रतिसाद मिळेल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली. प्रास्ताविकातून महिला व बालविकास विभागाच्या आयुक्त नयना गुंडे यांनी कार्यक्रम आयोजनाबाबत माहिती दिली. याप्रसंगी पुणे विभागाचे उपायुक्त संजय माने, जिल्हा कार्यक्रम अधिकारी सुजित इंगवले, बाल विकास प्रकल्प अधिकारी अभिजीत पाटील आदी उपस्थित होते. प्रा. सुषमा पाटील यांनी सूत्रसंचालन केले. 

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes