Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
९० दिवसात निवडणुका घ्या, गोकुळ निवडणुकीबाबत सुप्रीम कोर्टाचा आदेशबाजार समितीच्या तीन संचालकांना अपात्रतेसंबंधी नोटिस, १९ मे रोजी म्हणणे मांडण्याचे आदेशविनायक भोसले यांना लायन्स गौरव पुरस्कार प्रदानमहापौर चषक फुटबॉल स्पर्धेस उत्साहात प्रारंभ ! वेताळमाळ, पाटाकडील संघाची तालीम विजयी सलामी !!महिला - बाल कल्याण समितीच्या सभेत अंगणवाडी सक्षमीकरणावर चर्चाजीवन प्राधिकरण कार्यालयावर गुरुवारी  घागर मोर्चाराजारामपुरीत महापालिकेची धडक कारवाई ! सात हातगाड्या जप्त, अनधिकृत शेड्स हटवले ! ! गोकुळच्या इतिहासात गेल्या पाच वर्षात सर्वोत्तम कामगिरी, संचालक मंडळाचे प्रसिद्धीपत्रकगुरुदेव -कार्यकर्ते हळहळले ! विवेकानंद परिवार गहिवरला !!गोकुळवर प्रशासक नियुक्त, पाच अधिकाऱ्यांचे प्रशासक मंडळ

जाहिरात

 

राजारामपुरीत महापालिकेची धडक कारवाई ! सात हातगाड्या जप्त, अनधिकृत शेड्स हटवले ! !

schedule05 May 26 person by visibility 36 categoryमहानगरपालिका

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर कोल्हापूर महापालिकेच्या विभागीय कार्यालय क्रमांक तीन व अतिक्रमण निर्मूलन पथकाने मंगळवारी, पाच मे रोजी राजारामपुरी पहिली गल्ली परिसरात धडक कारवाई करत खाऊच्या गाड्या हटवून परिसर मोकळा केलाया कारवाईत ७ हातगाड्या जप्त करण्यात आल्यातर ४ दुकानांवरील अनधिकृत शेड्स आणि ४ दुकानांचे अनाधिकृत कट्टे तोडून काढण्यात आले. महापालिका आयुक्त डॉ.राजेंद्र भारुड यांनी दुपारी राजारामपुरी जनता बाजार खाऊ गल्ली परिसराला अचानक भेट देत पाहणी केलीयावेळी रस्त्याच्या दुतर्फाफुटपाथवर तसेच सामासिक अंतरामध्ये करण्यात आलेले बांधकामसार्वजनिक जागेत उभारलेल्या टपऱ्याखोकी व अन्य अतिक्रमणे केली असल्याचे निदर्शनास आलेत्यानंतर संबंधित ठिकाणी तातडीने कारवाई करण्याचे आदेश आयुक्त भारुड यांनी दिले. या ठिकाणी पार्किंगसाठी राखीव जागेत कोणतेही अतिक्रमण होऊ नयेअशा सक्त सूचना उप-शहर अभियंत्यांना देण्यात आल्यातसेच व्यावसायिकांनी स्वत:हून आपले अनधिकृत अतिक्रमण काढून घ्यावेअन्यथा महापालिकेकडून कारवाई करून त्याचा खर्च संबंधितांकडून वसूल करण्यात येईलअसा इशाराही आयुक्तांनी दिला. यावेळी अतिरिक्त आयुक्त रविकांत आडसूळ, उप-आयुक्त किरणकुमार धनवाडे, सहायक आयुक्त जयंत जावडेकर, उपशहर अभियंता अरुण गुजरअतिक्रमण प्रमुख प्रफुल्ल कांबळेकनिष्ठ लिपीक सजन नागलोत उपस्थित होते.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes