Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
गांधीनगर परिसरातील अनाधिकृत बांधकामावर उद्यापासून कारवाईडॉ. बापूजी साळुंखे इंजिनिअरिंग इन्स्टिट्यूटची  शंभर टक्के निकालाची परंपरा कायमब्राह्मण सभा करवीरतर्फे ग्रंथदिंडी, ४० वारकरी बालचमूंचा सहभागरोटरी सेंट्रलच्या अध्यक्षपदी डॉ. भूषण शेंडगे, सचिवपदी अविनाश चिकनीसअमित शहांच्या सभेत संयुक्त महाराष्ट्राच्या घोषणा, एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी काढले बाहेरभारत म्हणजे धर्मशाळा नव्हे, एक- एक घुसखोर शोधून देशाबाहेर घालवू - अमित शाहअंबाबाई मंदिर विकास आराखडयामुळे धार्मिक पर्यटनासह स्थानिक अर्थव्यवस्थेलाही बळशहरात २२ जूनपासून एक दिवसाआड पाणीपुरवठाटीईटीसाठी कोल्हापूर केंद्रावर उच्चांकी परीक्षार्थी, नागमोडी बैठक व्यवस्थाशिवसेनेच्या वर्धापनदिनानिमित्त कोल्हापुरात जल्लोष; शिवाजी चौकात जिलेबी वाटप

जाहिरात

 

महापौर चषक फुटबॉल स्पर्धेस उत्साहात प्रारंभ ! वेताळमाळ, पाटाकडील संघाची तालीम विजयी सलामी !!

schedule05 May 26 person by visibility 192 categoryक्रीडा

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : महापौर चषक फुटबॉल स्पर्धेस मंगळवारपासून सुरुवात झाली. सलामीच्या सामन्यात वेताळमाळ तालीम मंडळ फुटबॉल संघाने वर्षा विश्वास तरुण मंडळ संघावर तीन विरुद्ध शून्य गोलफरकांनी विजयी मिळवला. पाटाकडील तालीम मंडळ संघाने सुभाषनगर फुटबॉल क्लब संघावर आठ विरुद्ध तीन गोलफरकांनी विजयी सलामी दिली.

. महापौर रुपाराणी निकम, आयुक्त डॉ.राजेंद्र भारुड, उपमहापौर अक्षय जरग, स्थायी समिती सभापती विशाल शिराळे, महिला बालकल्याण समिती सभापती कौसर बागवान, सभागृह नेता मुरलीधर जाधव, विरोधी पक्षनेता राजेश लाटकर, गटनेता आदिल फरास, इंद्रजित बोंद्रे यांनी फुटबॉलला किक मारुन या स्पर्धेचा शुभारंभ करण्यात आला. अतिरिक्त आयुक्त रविकांत आडसूळ व उप-आयुक्त किरणकुमार धनवाडे यांनी पदाधिकारी, नगरसेवक यांचे रोपटे देऊन स्वागत केले. नगरसेवक विजयसिंह खाडे-पाटील, विनायक फाळके, संजय मोहिते, अमर समर्थ, अशकीन आजरेकर,  नगरसेविका सौ.नेहा तेंडुलकर, अनुराधा खेडकर, सौ.सृष्टी जाधव, इस्टेट ऑफिसर शेखर साळोखे यांची प्रमुख उपस्थिती होती.

वेताळमाळ तालीम मंडळ संघाकडून रोहित देसाई, प्रणव कणसे व आकाश मोरे या फुटबॉलपटूनी गोल केले. दुपारी चार वाजता पाटाकडील तालीम मंडळ विरुध्द सुभाषनगर फुटबॉल क्लब यांच्यामध्ये खेळविण्यात आला. हा सामना पाटाकडील तालीम मंडळने आठ विरुध्द तीन गोलफरकांनी  जिंकला. पीटीएमच्या रोहित पवार, ओंकार मोरे, ऋषीकेष मेथे-पाटील, अरबाज पेंढारीने गोल केले सुभाषनगर फुटबॉल क्लबचा खेळाडू नितीन पोवार, आर्यन पांढरेने यांनी गोल केले. बुधवार सहा मे रोजी दुपारी दोन वाजता दिलबहार तालीम विरुध्द संध्यामठ तरुण मंडळ, दुपारी चार वाजता श्री शिवाजी तरुण मंडळ विरुध्द रंकाळा तालीम मंडळ असे एकूण दोन सामने खेळविण्यात येणार आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes