Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
घोडावत ऑलिम्पियाड स्कूलचे डॉ.होमी भाभा परीक्षेत यशसक्तीच्या टीईटी परीक्षेतून सवलत मिळण्यासाठी खासदारांना घेऊन पंतप्रधानांना भेटणार - खासदार धैर्यशील मानेआरोग्य विभागात साफसफाई ! जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रशांत वाडीकर, सुप्रिया देशमुख निलंबित !!महामानवाच्या द्विजन्मशताब्दीचा सरकारला विसर ! क्रांतिबा जोतिबांचा वापर राज्यकर्त्यांकडून केवळ भाषणापुरताच ! !अशक्य ते शक्य करतात मुश्रीफ ! रामायणात दहा तोंडाचा रावण, बाजार समितीत अठरा तोंडाची रावणं !!कोल्हापूर बाजार समितीच्या सभापतिपदी नानासो कांबळे-साकेकरसेवक संघाचे ठिय्या आंदोलन, प्रशासनाने घेतला पदोन्नतीचा निर्णयबाजार समितीत पदाधिकारी बदलाचे राजकारण दमदार ! सभापती - संचालक मंडळाची कामगिरी मात्र सुमार !!अंजू तुरंबेकर देणार भूतानच्या महिला फुटबॉलपटूना प्रशिक्षणश्रीराम पचिंद्रे यांच्या शाहू कादंबरीतील पाठ शालेय अभ्यासक्रमात

जाहिरात

 

बांधकाम समिती सभापती सारिका नांंदेकर यांचा कार्यालय प्रवेश

schedule05 Apr 26 person by visibility 73 categoryजिल्हा परिषद

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या बांधकाम व आरोग्य विभागाच्या सभापती सारिका यशवंत नांदेकर यांच्या नूतन दालन प्रवेशाचा कार्यक्रम उत्साहात झाला.  पालकमंत्री प्रकाश आबिकटर, आमदार अशोकराव माने, माजी  राज्यमंत्री भरमू पाटील, माजी खासदार संजय मंडलिक, जनसुराज्य शक्ती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समित कदम, माजी आमदार सुजित मिणचेकर, के. जी. नांदेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यालय प्रवेशाचा कार्यक्रम झाला. याप्रसंगी पालकमंत्री आबिटकर म्हणाले, ‘शिवसेना मुख्य नेते व उपमुख्यमंत्री  एकनाथ शिंदे यांनी नेहमीच महिलांना राजकारणात मानाचे स्थान मिळावे, यासाठी प्रयत्नशील राहिले आहेत. त्यांनी हा विचार फक्त बोलण्यापुरता मर्यादित न ठेवता प्रत्यक्ष कृतीत आणून ग्रामपंचायतीपासून ते संसदेपर्यंत अनेक लाडक्या बहिणींना महत्त्वाची पदे दिली आहेत. सारिका नांदेकर यांनी स्वतःला केवळ एका जिल्हा परिषद मतदारसंघाच्या प्रतिनिधी न समजता बारा तालुक्यांच्या सभापती समजावे आणि विकसित विकासासाठी प्रभावीपणे काम करावे.’ याप्रसंगी शिवसेना जिल्हाध्यक्ष विजय बलुगडे, भाजप जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटील, जिल्हा परिषदेतील शिवसेनेचे गटनेते अरुण जाधव, गोकुळ संचालक  नंदकुमार ढेंगे, कृषी संचालक दत्तात्रय उगले, शिक्षण सभापती  शितल यादव, जिल्हा परिषद सदस्या रोहिणी आबिटकर, पंचायत समिती सभापती विक्रम पाटील,  संतोष जोशी, अभय तेंडुलकर उपस्थित होते .

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes