Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
अशक्य ते शक्य करतात मुश्रीफ ! रामायणात दहा तोंडाचा रावण, बाजार समितीत अठरा तोंडाची रावणं !!कोल्हापूर बाजार समितीच्या सभापतिपदी नानासो कांबळे-साकेकरसेवक संघाचे ठिय्या आंदोलन, प्रशासनाने घेतला पदोन्नतीचा निर्णयबाजार समितीत पदाधिकारी बदलाचे राजकारण दमदार ! सभापती - संचालक मंडळाची कामगिरी मात्र सुमार !!अंजू तुरंबेकर देणार भूतानच्या महिला फुटबॉलपटूना प्रशिक्षणश्रीराम पचिंद्रे यांच्या शाहू कादंबरीतील पाठ शालेय अभ्यासक्रमात​ बाजार समितीतील पदोन्नती प्रकरणातील दोषींवर कारवाई करा; भाजप सहकार आघाडीचे सचिवांना निवेदन करवीरमधील ७० दूध संस्थांची सुनावणी, पन्हाळा- गगनबावडातील दूध संस्थांना नोटीसपदवीधर मतदार संघावर महायुतीचा भगवा फडकविण्यासाठी सज्ज व्हावे : आमदार राजेश क्षीरसागरनवकार महामंत्र पठण कार्यक्रमात जिल्ह्यात ३४ हजार जणांचा सहभाग

जाहिरात

 

कोल्हापूर बाजार समितीच्या सभापतिपदी नानासो कांबळे-साकेकर

schedule10 Apr 26 person by visibility 307 categoryराजकीय

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : कोल्हापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी कागल तालुक्यातील साके  येथील नानासो धर्मा कांबळे- साकेकर यांची निवड करण्यात आली. शुक्रवारी झालेल्या विशेष सभेत त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले. नानासो कांबळे हे माजी आमदार संजय घाटगे यांचे समर्थक आहेत. त्यांनी यापूर्वी जिल्हा परिषद सदस्य आणि उपसरपंच तसेच विविध संस्थेवर काम करीत आहेत.  एका सामान्य शेतकरी कुटुंबातील कार्यकर्त्याला जिल्हास्तरावरील मोठ्या संस्थेवर सभापती म्हणून काम करण्याची संधी मिळाली आहे.

​ सभापती पदासाठी नानासो कांबळे यांचा एकमेव अर्ज दाखल झाला होता त्यांच्या अर्जाला सूचक म्हणून मावळते सभापती सूर्यकांत पाटील तर अनुमोदक म्हणून शेखर देसाई यांनी अनुमोदन दिले. सभापती पदासाठी एकमेव अर्ज आल्याने निवडणूक निर्णय अधिकारी प्रिया दळणर यांनी सभापतीपदी नानासो कांबळे यांची बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर केले.

​ कांबळे यांनी यापूर्वी जिल्हा परिषद: २००७ ते २०१२ या काळात बोरवडे मतदारसंघातून जिल्हा परिषद सदस्य म्हणून काम केले आहे.एप्रिल २०२३ मध्ये झालेल्या बाजार समितीच्या पंचवार्षिक निवडणुकीत त्यांनी मागासवर्गीय गटातून मोठ्या मताधिक्याने विजय मिळवला होता. संचालक म्हणून काम करताना त्यांनी बाजार समितीच्या उन्नतीसाठी आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर नेहमीच आवाज उठवला. 

 सभापती निवडीच्या या बैठकीला, संचालक राजाराम चव्हाण, भारत पाटील भुयेकर, बाळासाहेब पाटील, प्रकाश देसाई, नंदकुमार वळंजू,  शेखर देसाई, सुयोग वाडकर, शिवाजी पाटील, संदीप वरांडेकर, मेघा देसाई, कुमार अहुजा, सचिव तानाजी दळवी आदी उपस्थित होते.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes