काँग्रेसकडे 1851 ठराव, गोकुळच्या निवडणुकीत बिन आवाजाचा बॉम्ब फुटणार- सतेज पाटील
schedule30 Jun 26 person by visibility 618 categoryउद्योग
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी : ' गोकुळ दूध संघ टिकला पाहिजे, वाढला पाहिजे यासाठी आमची लढाई सुरू आहे .आमच्यामध्ये कोणी मोठा भाऊ नाही , कोणी लहान भाऊ नाही. जागा वाटपावरून आमच्यात मतभेद नाहीत. दूध उत्पादकांच्या हिताचे भूमिका घेऊन समविचारी आघाडी निवडणुकीला सामोरे जात आहे. गोकुळच्या निवडणुकीत काँग्रेसकडे 1851 ठराव जमा आहेत. अनेकजण संपर्कात आहेत त्यामुळे गोकुळच्या निवडणुकीत बिन आवाजाचा बॉम्ब फुटणार ' असा विश्वास राजश्री शाहू शेतकरी आघाडीचे नेते व काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार सतेज पाटील यांनी व्यक्त केला. गोकुळ निवडणूक बिनविरोध करण्यासंबंधी आपल्याकडे कोणताही प्रस्ताव आला नाही असे त्यांनी स्पष्ट केले.
गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीसाठी सध्या ठराव दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखालील राजर्षी शाहू शेतकरी समविचारी आघाडीतर्फे मंगळवारी 30 जून रोजी ठराव दाखल करण्यात आले त्या अगोदर ताराबाई पार्क येथील धैर्यप्रसाद हॉल येथे ठरावधारकांचा मेळावा झाला. या मेळाव्यात आमदार सतेज पाटील यांचे प्रमुख भाषण झाले. आमदार पाटील यांनी समविचारी आघाडीतर्फे आतापर्यंत 779 ठराव दाखल झाला आहेत. 30 जून आणि एक जुलै या दोन दिवसाच्या कालावधीत आणखी 872 ठराव होतील समविचारी आघाडीकडे एकूण 1851 ठराव आहेत .जिल्ह्यातील अनेक ठरावधारक संपर्कात आहेत. त्यामुळे दूध उत्पादकांच्या विश्वासावर ही लढाई आम्ही जिंकू 'असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. गोकुळ मध्ये सत्ता आल्यानंतर पशुखाद्यामध्ये शंभर रुपयाची कपात करू अशी घोषणाही पाटील यांनी केली. गोकुळच्या अस्मितेसाठी , कोल्हापूर जिल्ह्याच्या स्वाभिमानासाठी आपण निवडणूक लढवत आहोत. आमचे उमेदवार मुंबईत ठरवले जात नाहीत, समविचारी आघाडीचे उमेदवार कोल्हापुरातच निश्चित होतात असा टोलाही त्यांनी लगावला. सध्या महायुतीमध्ये ठरावधारकांची संख्या आणि जागावाटपावरून धुसफूस सुरू आहे. महायुतीतील पक्षांमध्ये अस्वस्थता आहे . लहान भाऊ मोठा भाऊ यावरून महायुती संघर्ष आहे असा हल्लाबोल करत आमदार सतेज पाटील म्हणाले, समविचारी आघाडीची लढाई ही दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी आहे. आमच्यामध्ये कोणीही मोठा भाऊ आणि लहान भाऊ नाही. आमच्यात जागा वाटपावरून अस्वस्थता नाही. मुळात मला चेअरमन व्हायचे नाही. आमच्या कुटुंबातील कोणी संचालक असणार नाहीत. कार्यकर्त्यांच्या हक्कासाठी ही लढाई ही आम्ही करत आहोत.
गोकुळ निवडणुकीच्या कालावधीत प्रत्येकाने दक्ष पाहिजे. आम्ही समविचारी आघाडी सोबत आहोत असा स्टीकरच ठरावधारकानी आपल्या घराच्या दारावर लावावा असे आवाहन आमदार पाटील यांनी केले. दहा वर्षांपूर्वी आम्ही मल्टीस्टेट विरोधात लढा दिला. पाच वर्षांपूर्वी सत्तेत आल्यानंतर गाय व म्हैस दूध खरेदी दरात वाढ केली. दूध उत्पादकांच्या हिताचा अजेंडा आमच्या केंद्रस्थानी आहे. गोकुळचे शिल्पकार स्वर्गीय आनंदराव पाटील चुयेकर यांची गोकुळ दूध उत्पादकांना न्याय देण्याची जी भूमिका होती त्याच विचाराने आम्ही काम करणार आहोत असेही पाटील म्हणाले.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते व माजी खासदार राजू शेट्टी यांनी समविचारी आघाडीला निवडून द्या. दूध उत्पादकांच्या न्यायासाठी प्रत्येकाने सजग राहिले पाहिजे असे आवाहन केले . याप्रसंगी बोलताना दत्त कारखान्याचे चेअरमन गणपतराव पाटील, गोपाळराव पाटील , माजी आमदार राजीव आवळे, शिक्षक आमदार जयंत आसगावकर, गोकुळचे संचालक शशिकांत पाटील चुयेकर, अंजना रेडेकर, बयाजी शेळके, बिद्री कारखान्याचे संचालक राहुल देसाई , सत्यजित जाधव, रामराजे कुपेकर, विद्याधर गुरंबे यांनी आमदार सतेज पाटील हे कार्यकर्त्यांना बळ देणारे नेते आहेत. जिल्ह्यातील उत्पादकांच्या न्याय देण्याची त्यांची कामगिरी आहे . गेली पाच वर्षे त्यांनी गोकुळमध्ये चोखपणे कारभार केला. त्यामुळे या निवडणुकीतही समविचारी आघाडी सोबत आपण सारे राहूया असे आवाहन या नेते मंडळींनी केले
या मेळाव्याला गोकुळचे संचालक अभिजीत तायशेटे, बाबासाहेब चौगुले, बाळासाहेब सरनाईक, जीवन पाटील, सचिन घोरपडे, हिंदुराव चौगुले, रणधीर मोरे उदयानी साळोखे, काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रवीण केसरकर , राजेश लाटकर, इंद्रजीत बोंद्रे , जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष शशिकांत खोत आदी उपस्थित होते.