विवेकानंद कॉलेजमध्ये विवेक वार्षिक अंकाचे प्रकाशन
schedule29 Jun 26 person by visibility 40 categoryशैक्षणिक
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी : येथील विवेकानंद कॉलेज येथे महाविद्यालयीन नियतकालिक 'विवेक'(२०२५-२६)या वार्षिक अंकाचे प्रकाशन श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. सी. बी. पाटील, संपादक प्रा. डॉ. एकनाथ आळवेकर उपस्थित होते. या प्रकाशन कार्यक्रमात बोलताना प्राचार्य अभयकुमार साळुंखे यांनी विद्यार्थ्यांमधील सर्जनशीलता, ज्ञानसंपदा आणि साहित्यिक जाणीव विकसित करण्यासाठी महाविद्यालयीन पातळीवर वार्षिक अंकाचे महत्त्व असल्याचे सांगितले. यातून लेखक, कवी निर्माण होतात. वार्षिक अंकात लेखन करणाऱ्या विद्यार्थ्यांचे त्यांनी अभिनंदन केले. याप्रसंगी डॉ. कविता तिवडे, डॉ. आरिफ महात, प्रा. डॉ. प्रदीप पाटील, प्रा. अशोक पाटील, प्रा. संतोष कुंडले, प्रा.डॉ. टेकचंद गोपाले, डॉ. एच. एस. नदाफ, डॉ. सुप्रिया पाटील उपस्थित होते