Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
सांगली जिल्हा माहिती कार्यालयाच्यावतीने पत्रकार संवादिका पुस्तिकाविवेकानंद कॉलेजमध्ये विवेक वार्षिक अंकाचे प्रकाशनखासगी क्लासेस-लॉजिंगसह दुकानांची तपासणी होणार, आयुक्तांचे सहाय्यक आयुक्तांना आदेशसेवा ज्येष्ठ शिक्षकांवरील अन्यायविरोधात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने, सीईओंना निवेदनगोकुळचे माजी चेअरमन विश्वास पाटील यांचे शक्तीप्रदर्शन, ३२४ ठराव दाखलगोकुळच्या निवडणुकीत संचालकपदाच्या चार जागा, एक वर्ष चेअरमनपद हवे- आमदार शिवाजीराव पाटील भाजपचे 1431 ठराव ! गोकुळच्या संचालक मंडळात भाजपच मोठा भाऊ !! खासदार धनंजय महाडिकगोकुळमध्ये अरुण नरके गट भाजपसोबत,  महाडिकांशी दोस्ताना कायमशहीद महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिन साजरामहात्मा फुले विद्यालयात हॅप्पी डिजिटल क्लासरुम, मॉडेल स्कूलसाठी प्रयत्नशील

जाहिरात

 

गोकुळच्या निवडणुकीत संचालकपदाच्या चार जागा, एक वर्ष चेअरमनपद हवे- आमदार शिवाजीराव पाटील

schedule29 Jun 26 person by visibility 134 categoryउद्योग

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : मंत्री हसन मुश्रीफ यांच्या कामकाजासंदर्भात मतभेद आहेत. मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महायुती म्हणून गोकुळची निवडणूक लढविण्याचे आदेश दिले आहेत.   मुख्यमंत्री फडणवीस यांचा आदेश  मानणारा मी कार्यकर्ता आहे. त्यामुळे महायुती म्हणूनच निवडणूक लढवणार. दरम्यान गोकुळच्या निवडणुकीत चंदगड- गडहिंग्लज -आजरा मतदारसंघाला मिळून संचालक पदाच्या एकूण चार जागा द्याव्यात तसेच एक वर्ष चेअरमनपद मिळायला हवे अशी स्पष्ट भूमिका आमदार शिवाजीराव पाटील यांनी मांडली.
 चंदगड मतदारसंघ नेहमीच दुर्लक्षित राहिला आहे. मात्र या तीनही तालुक्यातून गोकुळला उच्च प्रतीचा दूध पुरवठा केला जातो. गोकुळच्या दूध संकलनामध्ये या तीन तालुक्यातील दुधाचे प्रमाणे जास्त आहे. मात्र या मतदारसंघाला आवश्यक त्या प्रमाणात प्रतिनिधीतून मिळत नाही. गोकुळच्या होत असलेल्या निवडणुकीमध्ये या मतदारसंघासाठी चार जागा हव्यात तसेच एक वर्ष गोकुळचे चेअरमनपद या मतदारसंघाला मिळायला हवे असे स आमदार पाटील यांनी सांगितले. भारतीय जनता पक्षाच्यावतीने सोमवारी 29 जून रोजी महासैनिक दरबार हॉल येथे ठराव धारकांचा मेळावा आयोजित केला होता. याप्रसंगी प्रसार माध्यमाच्या प्रतिनिधीशी बोलताना आमदार पाटील यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. मंत्री हसन मुश्रीफ यांच्या कामकाजाविषयी आपले मतभेद स्पष्ट आहेत.मात्र मुख्यमंत्र्यांचा आदेश पाळणारा  मी कार्यकर्ता आहे . गेल्या पाच वर्षाच्या कालावधीत गोकुळमध्ये  जवळपास 1300 हून अधिक बोगस संस्था काढले आहेत या संस्थाच्या विरोधात आम्ही आवाज उठवला. बोगस संस्था जर कमी झाल्या नसत्या तर इतर तालुक्यांना कधीच  गोकुळमध्ये संधी मिळाली नसती याचाही त्यांनी पुनरुच्चार केला. याप्रसंगी माजी मंत्री  भरमू पाटील उपस्थित होते.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes