Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
सांगली जिल्हा माहिती कार्यालयाच्यावतीने पत्रकार संवादिका पुस्तिकाविवेकानंद कॉलेजमध्ये विवेक वार्षिक अंकाचे प्रकाशनखासगी क्लासेस-लॉजिंगसह दुकानांची तपासणी होणार, आयुक्तांचे सहाय्यक आयुक्तांना आदेशसेवा ज्येष्ठ शिक्षकांवरील अन्यायविरोधात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने, सीईओंना निवेदनगोकुळचे माजी चेअरमन विश्वास पाटील यांचे शक्तीप्रदर्शन, ३२४ ठराव दाखलगोकुळच्या निवडणुकीत संचालकपदाच्या चार जागा, एक वर्ष चेअरमनपद हवे- आमदार शिवाजीराव पाटील भाजपचे 1431 ठराव ! गोकुळच्या संचालक मंडळात भाजपच मोठा भाऊ !! खासदार धनंजय महाडिकगोकुळमध्ये अरुण नरके गट भाजपसोबत,  महाडिकांशी दोस्ताना कायमशहीद महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिन साजरामहात्मा फुले विद्यालयात हॅप्पी डिजिटल क्लासरुम, मॉडेल स्कूलसाठी प्रयत्नशील

जाहिरात

 

सांगली जिल्हा माहिती कार्यालयाच्यावतीने पत्रकार संवादिका पुस्तिका

schedule29 Jun 26 person by visibility 19 categoryजिल्हा परिषद

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी : जिल्हा माहिती कार्यालय, सांगली यांच्यावतीने तयार करण्यात आलेल्या सामाजिक न्याय विभागाच्या योजनांची घडीपत्रिका तसेच पत्रकारांसाठीच्या योजनांची माहिती देणाऱ्या 'पत्रकार संवादिका' या मार्गदर्शक पुस्तिकेचे प्रकाशन राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण व सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते  जिल्हाधिकारी कार्यालयात करण्यात आले.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बैठक सभागृहात झालेल्या या प्रकाशन कार्यक्रम प्रसंगी जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष, जिल्हा नियोजन अधिकारी अशोक पाटील, समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त बाळासाहेब कामत, पालकमंत्री महोदयांचे विशेष कार्य अधिकारी बाळासाहेब यादव, जिल्हा माहिती अधिकारी संप्रदा बीडकर उपस्थित होते.

पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, पत्रकारांसाठी सरकारमार्फत विविध कल्याणकारी योजना राबविल्या जात असल्या तरी अनेकदा आवश्यक माहिती किंवा कागदपत्रांच्या अभावामुळे पात्र पत्रकारांना त्यांचा लाभ घेता येत नाही. ही बाब लक्षात घेऊन जिल्हा माहिती कार्यालयाने तयार केलेली ही पुस्तिका पत्रकारांसाठी अत्यंत उपयुक्त ठरेल.

पत्रकार संवादिकेत पत्रकारांसाठी असलेल्या प्रमुख योजनांची सविस्तर माहिती आहे. प्रत्येक योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक असणाऱ्या कागदपत्रांची माहितीही स्पष्टपणे नमूद करण्यात आली आहे. सामाजिक न्याय विभागाच्या माध्यमातून राबवण्यात येत असलेल्या प्रमुख योजनांची माहिती घडीपत्रिकेत देण्यात आली असून, त्यामुळे नागरिकांचे प्रबोधन होण्यास मदत होईल.

कोल्हापूर विभागाचे उपसंचालक प्रवीण टाके यांच्या संकल्पनेतून आणि पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या प्रेरणेतून ही पुस्तिका तयार केली आहे. त्यासाठी माहिती व जनसंपर्क विभागाचे प्रधान सचिव ब्रिजेश सिंह यांचे मार्गदर्शन लाभले आहे. जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) व अनुसूचित जाती उपयोजना यांच्या निधीतून पुस्तिका व घडीपत्रिका तयार करण्यात आली आहे. कार्यक्रमात सहाय्यक आयुक्त बाळासाहेब कामत यांनी घडीपत्रिका तसेच, जिल्हा माहिती अधिकारी संप्रदा बीडकर यांनी पत्रकार संवादिका पुस्तिकेच्या निर्मितीमागील उद्देश स्पष्ट केला. 

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes