Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
सांगली जिल्हा माहिती कार्यालयाच्यावतीने पत्रकार संवादिका पुस्तिकाविवेकानंद कॉलेजमध्ये विवेक वार्षिक अंकाचे प्रकाशनखासगी क्लासेस-लॉजिंगसह दुकानांची तपासणी होणार, आयुक्तांचे सहाय्यक आयुक्तांना आदेशसेवा ज्येष्ठ शिक्षकांवरील अन्यायविरोधात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने, सीईओंना निवेदनगोकुळचे माजी चेअरमन विश्वास पाटील यांचे शक्तीप्रदर्शन, ३२४ ठराव दाखलगोकुळच्या निवडणुकीत संचालकपदाच्या चार जागा, एक वर्ष चेअरमनपद हवे- आमदार शिवाजीराव पाटील भाजपचे 1431 ठराव ! गोकुळच्या संचालक मंडळात भाजपच मोठा भाऊ !! खासदार धनंजय महाडिकगोकुळमध्ये अरुण नरके गट भाजपसोबत,  महाडिकांशी दोस्ताना कायमशहीद महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिन साजरामहात्मा फुले विद्यालयात हॅप्पी डिजिटल क्लासरुम, मॉडेल स्कूलसाठी प्रयत्नशील

जाहिरात

 

खासगी क्लासेस-लॉजिंगसह दुकानांची तपासणी होणार, आयुक्तांचे सहाय्यक आयुक्तांना आदेश

schedule29 Jun 26 person by visibility 54 categoryशैक्षणिकमहानगरपालिका

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी: महानगरपालिकेच्या सर्व सहाय्यक आयुक्तांनी आपल्या विभागीय कार्यालयांतर्गत येणाऱ्या खाजगी क्लासेस, लॉजिंग व सर्व दुकानांची तपासणी करावी असे निर्देश आयुक्त डॉ. राजेंद्र भारुड यांनी दिले. निवडणूक कार्यालयात आयोजित आढावा बैठकीत त्यांनी महत्त्वाच्या सूचना दिल्या.

            शहरात खासगी पार्किंगची संख्या वाढल्याने सर्व पार्किंगसाठी परवाना बंधनकारक होणार आहे. त्यानुसार नियमावली निश्चितीसह कार्यवाही सुरू करण्याच्या सूचना त्यांनी उपआयुक्तांना दिल्या. खाजगी क्लासेसच्या इमारतींमध्ये अग्निसुरक्षेची व्यवस्था असली तरी आवश्यकतेनुसार क्लासेससाठी स्वतंत्र अग्निसुरक्षा उपाययोजना करण्याबाबत अग्निशमन विभागाने संबंधितांना सूचना द्याव्यात.  शहरातील धोकादायक इमारतींची सर्व सहाय्यक आयुक्त व उपशहर अभियंत्यांनी श्रेणीवार पुन्हा पडताळणी करावी. संबंधितांनी स्वतःहून धोकादायक इमारती हटवल्या नाहीत तर नियमानुसार पुढील कारवाई करण्यात यावी असे निर्देशही त्यांनी दिले. महापालिकेला सीएसआर निधीतून प्राप्त झालेले 700 दिवे पूर्णपणे बसविण्यात आले असून उर्वरित दिवेही विविध बँकांच्या सीएसआर माध्यमातून उपलब्ध करून घेण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचना लेखा विभागाला देण्यात आल्या.  विभागीय कार्यालय स्तरावर ऑनलाइन परवाना प्रणालीला सुरुवात झाली. त्याद्वारे जवळपास अठरा हजार नवीन परवानाधारक शोधून काढण्याचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. 

 अतिरिक्त रविकांत आडसूळ, उप-आयुक्त परितोष कंकाळ, किरणकुमार धनवाडे, सहाय्यक आयुक्त जयंत जावडेकर, उज्वला शिंदे, स्वाती दुधाणे, डॉ.विजय पाटील, राम काटकर, मुख्य लेखापरिक्षक कलावती मिसाळ, लेखा व वित्त अधिकारी राजश्री पाटील, मुख्य लेखापाल संजय सरनाईक, शहर अभियंता रमेश मस्कर, आरोग्याधिकारी डॉ.प्रकाश पावरा, उपशहर अभियंता महादेव फुलारी, सुरेश पाटील, निवास पोवार, अरुणकुमार गवळी, उपशहर रचनाकार एन.एस.पाटील, करनिर्धारक व संग्राहक सुधाकर चल्लावाड, मुख्य आरोग्य निरीक्षक जयवंत पवार, रवका अधिकारी प्रशांत पंडत, पर्यावरण अधिकारी समीर व्याघ्रांबरे, सिस्टीम मॅनेजर यशपालसिंह रजपूत, इस्टेट ऑफिसर शेखर साळोखे, मुख्य अग्निशमन अधिकारी मनीष रणभिसे, कनिष्ठ अभियंता पदमल पाटील उपस्थित होते.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes