Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
युवराज्ञी संयोगिताराजे छत्रपती यांच्या हस्ते सुवर्णालंकारित तोरणाचे पूजन डॉ. शिवाजीराव कदम यांच्याकडून प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डींगला 25 लाखाची देणगी डी. सी. कुंभारांना तीन दिवसाची पोलिस कोठडीनीट -  सीबीएसई परीक्षतील घोटाळ्यांविरोधात काँग्रेसचा कँडल मार्चशिवराज्याभिषेक सोहळयासाठी कोल्हापूर हायकर्सतर्फे जल संकलनआठवणीतीले दवबिंदू कवितासंग्रहातून आयुष्याकडे सकारात्मक दृष्टीने पाहण्याची मानसिकता लाभते– प्राचार्य जी.पी.माळीनिरोगी आरोग्य हीच खरी संपत्ती – भरत रसाळेकोल्हापुरात गुरुवारी महाराष्ट्र धर्म याविषयी परिषदकोल्हापूर मेट्रोसिटीसाठी राजू मानेंचे धरणे आंदोलनराष्ट्र सेवा दलातर्फे दोन दिवसीय कार्यकर्ता कार्यशाळा - जिल्हास्तरीय मेळावा

जाहिरात

 

प्रवेश प्रक्रिया विना डोनेशन पूर्ण करा, एकही विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहू नये - आमदार राजेश क्षीरसागर

schedule01 Jun 26 person by visibility 96 categoryमहानगरपालिका

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी  : शाळा व जुनियर   कॉलेजमधील  प्रवेश प्रक्रिया सुरळीत पार पाडण्याची आणि कोणत्याही विद्यार्थी व पालकाची फसवणूक, लुट होणार नाही याची सर्वस्वी जबाबदारी शिक्षण उपसंचालक कार्यालयाची आहे. अतिरिक्त फी, डोनेशन, बिल्डींग फंड, शालेय साहित्यांच्या माध्यमातून पालकांची होणारी लुट खपवून घेतली जाणार नाही. आरटीए मधून प्रवेश झालेल्या विद्यार्थ्यांवर कोणताही दुजाभाव होवू नये, पी.टी.ए.चे नियम डावलून मनमानी फी वाढ झाल्यास तात्काळ कारवाई करा. कोणाचीही मुलाहिजा न बाळगता विनाडोनेशन पारदर्शी प्रवेश प्रक्रिया पूर्ण करा, जिल्ह्यातील एकही विद्यार्थी शालेय, महाविद्यालयीन प्रवेशापासून वंचित राहता कामा नये, अशा सक्त सूचना राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर यांनी शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या.

शाळा व महाविद्यालयीन प्रवेशाबाबत शिक्षण विभागाची शासकीय विश्रामगृह येथे आढावा बैठक पार पडली. याप्रसंगी ते बोलत होते. बैठकीच्या सुरवातीस शिक्षण उपसंचालक प्रभावती कोळेकर यांनी शालेय आणि ११ वी केंद्रीय प्रवेश प्रक्रियेचा आढावा आमदार  क्षीरसागर यांच्यासमोर सादर केला.

 "शिक्षणसम्राटांकडून चाललेली लुट थांबविण्यासाठी जिल्हा परिषद आणि महानगरपालिका शाळांचा दर्जा सुधारावा. खाजगी शाळांमध्ये नियुक्त असलेली पीटीए समितीवर शिक्षण संस्थेच्या मर्जीतील पालकांचा समावेश असल्याने खासगी शाळांचा मनमानी कारभार वाढला असल्याने मनमानी फी आकारली जाते, अशा शिक्षण संस्थांवर तात्काळ कारवाई करावी. यासह शालेय फी न भरल्याने विद्यार्थ्यांचे निकाल राखून ठेवण्याचे प्रकार यापूर्वी घडले असून, असे प्रकार घडू नयेत अशा सक्त सूचना शाळांना द्याव्यात. शालेय अतिरिक्त फी, डोनेशन, बिल्डींग फंड, शालेय साहित्यांच्या माध्यमातून पालकांची होणारी लुट तसेच  महाविद्यालयीन ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेदरम्यान विद्यार्थ्यांना कॉलेज अलॉटमेंट, कागदपत्रे पडताळणी किंवा प्रवेश निश्चित करताना कोणतीही तक्रार अथवा समस्या आल्यास त्यांनी शिवसेना आणि युवासेनेच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांशी संपर्क साधावा. विद्यार्थ्यांची गैरसोय टाळण्यासाठी आणि त्यांना योग्य मार्गदर्शन मिळवून देण्यासाठी शिवसेना- युवासेना पूर्णपणे पाठीशी उभे  आहे." असे आमदार क्षीरसागर यांनी  स्पष्ट केले 

 बैठकीस शिवाजी विद्यापीठाचे उपकुलसचिव पी.एस.पांडव, विभागीय सह संचालक प्रकाश बच्छाव, शिक्षण उपसंचालक प्रभावती कोळेकर, सहाय्यक संचालक गणपती कमळकर, माध्यमिक शिक्षणाधिकारी सुवर्णा सावंत, शिवसेना नगरसेवक प्रसाद चव्हाण, शिवसेना उपशहरप्रमुख अंकुश निपाणीकर, युवासेना जिल्हाप्रमुख चेतन शिंदे, शहरप्रमुख मंदार पाटील, शैलेश साळोखे, कपिल पोवार, सौरभ कुलकर्णी, शुभम शिंदे, रघुनंदन भावे, अमोल नवले, युवतीसेनेच्या नम्रता भोसले, निवेदिता तोरस्कर  उपस्थित होते.

 

 

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes