दुधाची आंघोळ करुन शासनाचा निषेध, पोलिस –कार्यकर्त्यांच्यामध्ये झटापट
schedule26 Mar 25 person by visibility 124 categoryजिल्हा परिषद
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : गायीच्या दुधाला प्रतिलिटर चाळीस रुपये दर मिळावा यासह अन्य मागण्यासाठी शेतकरी संघटनेतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. दूध खरेदी दरात सातत्यात होत असलेल्या कपातीच्या निषेधार्थ शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी दुधाची आंघोळ केली. यावेळी पोलिस व संघटनेच्या कार्यकर्त्यांमध्ये झटापट झाली. पोलिसांनी, कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले.
शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष माणिक पाटील, ज्योतिराम घोडके यांच्यासह अन्य कार्यकर्ते दुधाच्या किटल्या घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यासाठी दाखल झाले. यावेळी पोलिसांनी, त्यांना दुधाच्या किटल्या बाजूला ठेवा. किटल्या खाली ठेवून आंदोलन करा. दूध ओतू नका. अन्यथा गुन्हे दाखल करू असा इशारा दिला. मात्र कार्यकर्ते आंदोलनावर ठाम होते. पोलिसांचा इशारा झुगारत कार्यकर्त्यांनी अंगावर दुधाची किटली ओतन घेतली. घोषणा दिल्या. दुधाची किटली काढून घेण्यासाठी कार्यकर्त्यांना अडविण्याचा प्रयत्न पोलिसांनी केल. यावरुन पोलिस व संघटनेच्या कार्यकर्त्यांमध्ये झटापट केली. यावेळी अनिल जाधव, मच्छिंद्र पाटील, प्रकाश वारिंगे, पांडूरंग मगदूम, बाबासो गोसावी, दिगंबर पाटील, महादेव माने, प्रतिभा सुतार आदी उपस्थित होते.
…………….