मंत्री मुश्रीफांच्या वाढदिवसानिमित्त शहर राष्ट्रवादीतर्फे स्वाभिमानी सप्ताह-आदिल फरास
schedule05 Apr 25 person by visibility 145 categoryलाइफस्टाइल

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांच्या वाढदिवसानिमित्त कोल्हापूर शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे पाच एप्रिल २०२५ पासून ‘स्वाभिमानी सप्ताह’ साजरा करण्यात येणार आहे.’अशी माहिती राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष आदिल फरास यांनी दिली. या सप्ताहतंर्गत ‘अजित –हसन चषक फुटबॉल स्पर्धा’ मुख्य आकर्षण असेल असेही फरास म्हणाले.
शनिवारी, (पाच एप्रिल) असंघटित कामगार विभागातर्फे आरोग्य शिबिर होणार आहे. मिरजकर तिकटी येथे सकाळी ९.३० वाजता हे शिबिर होईल. याप्रसंगी ग्रीन हेल्थ कार्ड, नवीन नोंदणी, नूतनीकरण, शिष्यवृत्तींचे अर्ज मोफत भरुन दिले जाणार आहेत. रविवारी (सहा एप्रिल) जिवबा नाना जाधव पार्क येथे वृक्षारोपण, मिरजकर तिकटी येथील अंधशाळेत स्नेहभोजन आहे. सोमवारी, बालकल्याण संकुलमधील मुलांना स्नेहभोजन आहे. शहरात पंधरा ठिकाणी पाणपोई सुरू करण्यात येणार आहे.
मंगळवारी, आठ एप्रिल रोजी पंचगंगा नदी घाटाची स्वच्छता मोहीम, विद्यार्थी सेलतर्फे विविध कॉलेज परिसरात विद्यार्थी शाखा उद्घाटन कार्यक्रम आहे. १३ एप्रिल रोजी मिरजकर तिकटी येथे लहान मुलांसाठी चिल्लर पार्टीचे आयोजन केलो आहे. शास्त्रीनगर मैदानावर २४ ते २७ एप्रिल दरम्यान जिल्हास्तरीय टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा होणार आहे.पत्रकार परिषदेला माजी नगरसेवक महेश सावंत, उत्तम कोराणे, प्रकाश गवंडी, रेखा आवळे, जहिदा मुजावर, सुनील गाताडे, युवराज साळोखे, महेंद्र चव्हाण, पूजा साळोखे आदी उपस्थित होते.