Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
मुख्यमंत्री -उपमुख्यमंत्र्यांनी गोकुळ दूध संघ डॉ. डी. वाय. पाटील दूध संघ होण्यापासून वाचविला! धनंजय महाडिकांची सतेज पाटलांच्यावर बोचरी टीकासतेज पाटलांचा धनंजय महाडिकांवर पलटवार, गोकुळच्या निवडणुकीत घरातील उमेदवाराला कोल्हापूरकरांनी नाकारलंय पाचव्या स्मृतिदिनी बाबा सावंत यांच्या आठवणींना उजाळाशिक्षण चळवळीतील मी कार्यकर्ता, शाळा - शिक्षकांसाठी राबणार! पाचही जिल्ह्यात संपर्क कार्यालय, विद्यार्थ्यासाठी डिसेंबरमध्ये शिष्यवृत्ती सराव परीक्षा !!अभाविपची विद्यापीठासमोर कुलसचिवांच्याविरोधात निदर्शने, कार्यकर्ते- सुरक्षारक्षकांत झटापटतास प्रश्नोत्तराचा की वेळकाढूपणाचा ! सिनेट सभेत एकाच प्रश्नाभोवती चर्चा, दुसऱ्या विषयांना बगल देण्याचा डाव ! !शासन नियुक्त पाच संचालक निवडीच्या वटहुकूमावर राज्यपालांची स्वाक्षरीसोमवारच्या संघर्ष मोर्चाने सरकारला धडकी भरेल, काँग्रेस कमिटीत पदाधिकारी - कार्यकर्त्यांचा निर्धारविजयाचा इतका उन्माद की मुख्यमंत्र्यांसह अन्य नेत्यांचाही अपमान, हसन मुश्रीफांचा सतेज पाटील यांच्यावर निशाणादिवाळीनंतर स्थायी समिती सभा, शेवटच्या आठवड्यात सर्वसाधारण सभा!

जाहिरात

 

मुख्यमंत्री -उपमुख्यमंत्र्यांनी गोकुळ दूध संघ डॉ. डी. वाय. पाटील दूध संघ होण्यापासून वाचविला! धनंजय महाडिकांची सतेज पाटलांच्यावर बोचरी टीका

schedule07 Nov 26 person by visibility 671 categoryउद्योग

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर -: ‘गोकुळ दूध संघामध्ये शासन नियुक्त पाच संचालक निवडीचा निर्णय घेतल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सुनेत्रा पवार यांचे  आम्ही आभार मानतो. कारण गोकुळ दूध संघ हा डॉ. डी. वाय. पाटील दूध संघ होण्यापासून वाचविला. यापूर्वी सतेज पाटील यांनी सप्तगंगा सहकारी साखर कारखान्यातील सहा हजार सभासदांना बाजूला करुन एका  रात्रीत कारखान्याचे नाव डॉ. डी. वाय. पाटील साखर कारखाना केला आहे.’असा जोरदार टोला भारतीय जनता पक्षाचे खासदार धनंजय महाडिक यांनी लगाविला.

गोकुळ दूध संघाच्या अध्यक्ष निवडीसंबंधी सुरू असलेल्या सध्याच्या घडामोडीसंदर्भात ते पत्रकारांशी बोलत होते. मुख्यमंत्री फडणवीस यांची गोकुळसंदर्भातील भूमिका ही प्रारंभापासूनच सामज्यंसपणाची आहे. मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी गोकुळ हिताला प्राधान्य देत शासन नियुक्त संचालक संख्या वाढीचा व त्यांना मतदानाचा अधिकाराचा निर्णय घेतला. यामुळे गोकुळ दूध संघ हा आता डॉ.डी.वाय. पाटील दूध संघ होण्यापासून वाचला.

  गोकुळमध्ये समविचारी आघाडीला तेरा तर महायुतीचे बारा संचालक आहेत. सभेसाठी आवश्यक कोरम संख्या चौदा संचालकांची आहे. ही  वस्तुस्थिती माजी पालकमंत्री व आमदार सतेज पाटील हे लोकांना सांगत नाहीत.माजी पालकमंत्री पाटील हे खोटं बोलून लोकांची दिशाभूल करण्यात पटाईत आहेत. फेक नरेटिव्हचे ते बादशहा आहेत. टोल सक्तीच्या विरोधात संपूर्ण कोल्हापूरकर रस्त्यावर उतरले असताना त्यांनी टोलची पावती फाडत करवीरवासियांचा अवमानित करण्याचा प्रकार केला होता. गृहराज्यमंत्री असताना त्यांनी, शेतकरी आंदोलनाप्रसंगी त्यांनी पोलिसाकरवी शेतकऱ्यांना मारहाण करावयास लावली होती. त्यांच्या खूनशी स्वभावाची अनेकांना प्रचिती आहे. गोकुळ दूध संघाच्या निकालानंतर गोकुळ आपल्या ताब्यात आले असे समजून आमदार पाटील यांनी महायुतीशी जवळीक असलेल्या प्राथमिक दूध संस्था व कर्मचाऱ्यांची यादी बनविण्यास सुरुवात केली होती. प्राथमिक दूध संस्था व कर्मचाऱ्यांना त्रास देण्याचा हा कुठला प्रकार ? यामुळेच महायुतीच्या बारा संचालकांनी समविचारी आघाडीच्या अध्यक्ष निवडीसाठीच्या बैठकीकडे पाठ फिरवली. ’

खासदार महाडिक म्हणाले, ‘समविचारी आघाडीच्या संचालकाविरोधात महायुतीचे संचालक अंबरिश घाटगे, वीरेंद्र मंडलिक, करणसिंह गायकवाड हे ‘न्यायालयीन अवमान याचिका’ दाखल करणार आहेत. कारण समविचारी आघाडीच्या संचालक व वकिलांनी अध्यक्ष निवडीच्या सभेची माहिती महायुतीच्या तीन संचालकांना दिली नाही. मात्र त्यांनी, कोर्टात सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात या तीन संचालकांना सभेविषयी नोटीस पाठविल्याचे म्हटले आहे. वास्तविक कोणत्याही माध्यमातून त्यांनी सभेविषयीची नोटीस दिली नाही. समविचारी आघाडीने लोकांसोबतच कोर्टाचीही दिशाभूल केली आहे.  खोटे प्रतिज्ञापत्र देऊन कोर्टाचा अवमान केल्याप्रकरणी समविचारी आघाडीच्या विरोधात  सोमवारी, ९ नोव्हेंब रोजी महायुतीचे हे तीन संचालक अवमान याचिका दाखल करणार आहेत.’असे महाडिक म्हणाले. आमदार पाटील यांच्याकडून एकत्र कारभारासाठी आधीच प्रस्ताव दिला असता तर विचार केला असता असा टोलाही महाडिक यांनी लगाविला.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes