Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
विवेकानंद कॉलेज हे गुणवत्तेचे मानदंड - प्राचार्य अभयकुमार साळुंखे सुप्रीमच्या आदेशाचे पदाधिकाऱ्यांकडून स्वागत, निवडणुकीमुळे कार्यकर्त्यांना संधी मिळणारअंबाबाई मंदिर विकास आराखडा १४४५ कोटीचा, जोतिबा विकास आरखडयासाठी २५९ कोटीचाबार असोसिएशनमध्ये गटतट न आणता खंडपीठाचा लढा यशस्वी करू – नूतन पदाधिकारी-कार्यकारिणीकडे पदभार सुपूर्दस्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुका चार महिन्यात घ्या, सुप्रीम कोर्टाचा आदेशटॉप वीस शिक्षकांमध्ये पदवीधर शिक्षिका अर्चना सुतार, कविता सरदेसाई !कुशिरेच्या ज्योती चव्हाणचे बारावी परीक्षेत लख्खं यशबारावी परीक्षेत विवेकानंद कॉलेजच्या गुणवत्तेची परंपरा कायमगोखले कॉलेजचा बारावीत विज्ञान शाखेचा निकाल शंभर टक्केप्रशासनाची अॅक्शन, प्रदीप हुपरे निलंबित ! सदाशिव येजरेंचा कबुलीनामा !!

जाहिरात

 

धर्मादाय रुग्णालयांनी रुग्णांना दर्जेदार सुविधा द्याव्यात - पालकमंत्री प्रकाश आबिटकर

schedule18 Apr 25 person by visibility 97 categoryआरोग्य

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : राज्य सरकार धर्मदाय रुग्णालयांना वेगवेगळ्या पातळ्यांवर मदत करते . या धर्मदाय रुग्णालयांनी त्यांच्याकडे येणाऱ्या रुग्णांना दर्जेदार व सौजन्यपूर्वक सेवा प्रदान करावी असे आवाहन आरोग्यमंत्री तथा पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी केले .

कोल्हापुरातील  उद्यमनगरातील पंत वालावलकर रुग्णालयामध्ये राबविण्यात येणाऱ्या महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य व आयुष्यमान भारत -  प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेच्या लोकार्पण सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते 
   आबिटकर म्हणाले धर्मदाय रुग्णालयांनी प्रथमतः रुग्णावरील उपचाराला प्राधान्य द्यावे तसेच आर्थिक कारणावरून रुग्णांची अडवणूक होता कामा नये. रुग्ण, हा डॉक्टरांमध्ये ईश्वराचा अंश पाहतो त्यामुळे डॉक्टरांनीही आपल्यावरील जबाबदारी ओळखावी . धर्मदाय रुग्णालयांनी आपला नावलौकिक कसा वाढेल याकडे लक्ष द्यावे. हे रुग्णालय जिल्हयातील रुग्णांच्या वैद्यकीय गरजा नक्कीच पूर्ण करेल असा आशावादही व्यक्त केला . 
       महालक्ष्मी हेल्थ फाउंडेशनचे अध्यक्ष संतोष कुलकर्णी म्हणाले, या रुग्णालयाबाबत  रुग्णाची एक ही तक्रार येणार नाही . लोकांना अभिमान वाटेल अशी सेवा या रुग्णालयामार्फत दिली जाईल याची शाश्वती देतो असे सांगितले . यावेळी जतचे माजी आमदार विक्रम सावंत यांनीही विचार व्यक्त केले. महात्मा फुले व आयुष्यमान भारत प्रधानमंत्री योजनेच्या रूपाने सर्व प्रकारच्या रेशनकार्ड धारकांना याचा लाभ घेता येणार आहे . या योजनेमध्ये अस्थिरोग, पॉली - ट्रामा , जनरल सर्जरी , कान - नाक - घसा तसेच मुत्ररोग यांचा समावेश असून लवकरच या रुग्णालयात इतर आजारांच्या उपचारांच्या सोयीचाही समावेश होणार आहे .या रुग्णालयात नेत्र , दंत - चिकित्सा डिजिटल एक्स- रे ,सोनोग्राफी, लहान मुलांच्या शस्त्रक्रिया त्याचबरोबर सुसज्ज असा अतिदक्षता विभाग कार्यरत आहे तसेच हे रुग्णालय राज्य कामगार विमा आरोग्य योजनेशी ही संलग्न आहे .यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ .सुप्रिया देशमुख , डॉ.आर .एन गुणे, विरेंद्र वनकुद्रे  उपस्थित होते .
                             00000

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes