Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
कोल्हापुरात 22 ऑगस्टला जुनी पेन्शन योजना निर्धार मेळावाहसन मुश्रीफ फाउंडेशनचे आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी आवाहनपाणीपट्टी दरवाढीला महापालिकेच्या सभेत मंजुरी, दरवाढीतून मिळालेल्या रकमेचा विनियोग पाणी पुरवठा योजनेसाठीचजिल्हाधिकारी, सीईओंच्या उपस्थितीत जल जीवन मिशन, घनकचरा - सांडपाणी व्यवस्थापनची आढावा बेठकमहापालिकेच्या शाळेतील फलकावर शिक्षकांच्या जातीचा उल्लेख ! नगरसेवकांनी उघडकीस आणला प्रकार !!उद्योगविश्वाच्या बदलत्या गरजा ओळखा; टीसीएस उपाध्यक्षांचा टीकेआयईटी विद्यार्थ्यांना मंत्रमहापालिका शाळांच्या सेवा - सुविधेकडे नेहा तेंडुलकरने वेधले सभागृहाचे लक्षडॉ. प्रभाकर कोरे यांना घाळी समाजभूषण पुरस्कार, २४ ऑगस्टला वितरणकोल्हापूर प्रेस फोटोग्राफर क्लबचे पुरस्कार जाहीर !  अनिल वेल्हाळ, संजीव भोर यांना पुरस्कार ! !ताराबाई पार्कातील गोकुळ शॉपीला नवा लूक, दुधासह दुग्धजन्य पदार्थ उपलब्ध

जाहिरात

 

महापालिकेच्या शाळेतील फलकावर शिक्षकांच्या जातीचा उल्लेख ! नगरसेवकांनी उघडकीस आणला प्रकार !!

schedule19 Aug 26 person by visibility 664 categoryमहानगरपालिका

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी : कोल्हापूर महापालिकेच्या प्राथमिक शिक्षण समितीच्या मालकीच्या नेहरूनगर विद्यामंदिरमधील फलकावर शिक्षकांच्या जातीचा उल्लेख केला जात असल्याचा धक्कादायक प्रकार नगरसेवक प्रवीण सोनवणे यांनी महापालिकेच्या सर्वसाधारण सभागृहामध्ये उघडकीस आणला. राजर्षी शाहू महाराजांच्या भूमीमध्ये, आणि शाळेमध्ये शिक्षकांच्या जातीचा उल्लेख फलकावरती करणे हे योग्य नाही अशी आक्रमक भूमिका त्यांच्यासह अन्य नगरसेवकांनी घेतली.  याप्रश्नी संपूर्ण सभागृह  एकवटले. शाळेच्या भलकावर जातीचा उल्लेख करण्याचा आदेश कोणी दिला त्याच्यावर कडक कारवाई करा यासाठी संपूर्ण सभागृहाने आवाज बुलंद केला. अखेर आयुक्त राजेंद्र भारूड यांनी याप्रकरणी मध्यस्थी करत 'या संपूर्ण प्रकाराची चौकशी केली जाईल. शिक्षकांच्या जातीचा उल्लेख करावयास कोणी सांगितले, त्याची माहिती घेतली जाईल. मुख्याध्यापकांनी जर परस्पर असा निर्णय घेतला असेल तर त्यांच्याकडून खुलासा मागून निलंबित केले जाईल आणि त्यांना अशा प्रकारे जातीचा उल्लेखाचा फलक लावण्यासाठी कोणी अधिकारी आदेश दिला असेल तर त्या अधिकाऱ्यावरही कडक कारवाई केली जाईल अशी स्पष्ट ग्वाही आयुक्त भारुड यांनी सभागृहाला दिली
 दरम्यान महापालिका शाळेतील निधी वाटपात उर्दू शाळेला वगळल्यामुळे उपायुक्त किरणकुमार धनवडे यांच्यावर नगरसेवकांनी प्रश्नांचा भडीमार केला. मराठी व  उर्दू शाळेमध्ये भेदभाव कशासाठी करता ? कोल्हापुरात जातीपातीचे राजकारण चालत नाही ?  उर्दू शाळेमध्ये सुद्धा मुले शिकतात मग त्यांना निधी वाटपामध्ये हात का आखडता घेतला ? असा खडा सवाल करत किरणकुमार धनवडे यांना निलंबित करा अशी आक्रमक भूमिका नगरसेवकांनी घेतली. महापालिकेतील विरोधी पक्षनेते राजेश लाटकर यांनी धनवडे यांच्यावर कारवाई झाली पाहिजे असा आग्रह आयुक्त भारुड यांच्याकडे धरला. आयुक्त भारुड यांनी सरकारी जीआरचा हवाला देत मराठी शाळेसोबतच उर्दू शाळेला  निधी वाटपाचा समावेश करावा या अनुषंगाने सरकार  सोबत पत्रव्यवहार  जाईल असे सांगितले. दरम्यान सभागृहात चर्चेत भाग घेत असताना, ' नेहरूनगर विद्यामंदिर येथे शाळेच्या फलकावर शिक्षकांच्या जातीचा उल्लेख केले असल्याचा बोर्ड' नगरसेवक प्रवीण सोनवणे यांनी सभागृहात दाखवला. शाळेतील फलकावर शिक्षकांचा जातीचा उल्लेख कशासाठी ?  हा जातीभेद कोणाच्या आदेशाने सुरू आहे ? यामधून काय निष्पन्न करायचे आहे ? असा खडा सवाल नगरसेवक सोनवणे यांनी प्रशासनाला केला. शाळेतील फलकावर शिक्षकांच्या जातीचा उल्लेख कोणाच्या आदेशाने दिला हे सभागृहासमोर आले पाहिजे अशी आक्रमक भूमिका त्यांनी  घेतली. तसा आदेश देणाऱ्याचे नाव जाहीर करा अशी मागणी केली. नगरसेवक प्रवीण केसरकर, इंद्रजीत बोंद्रे, दुर्वास कदम,  मुश्ताक मलबारी यांनीही कारवाईची जोरदार मागणी केली. राष्ट्रवादीचे नगरसेवक आदिल फरास यांनी राजर्षी शाहूंच्या भूमीमध्ये जातिभेद कधी पाळला जात नाही. ही. समतेची भूमी आहे. तेव्हा शाळेतील फलकावर जातीचा उल्लेख करण्याचा आदेश कोणी दिला त्याच्यावर कडक कारवाई करावी अशी मागणी केली. महापालिकेतील सत्ताधारी बाजूच्या भारतीय जनता पक्ष शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नगरसेवकांनी याप्रश्नी आक्रमक भूमिका घेत, ' शाळेतील फलकावर शिक्षकांच्या जातीचा उल्लेख करणे योग्य नाही हा प्रकार तत्काळ थांबला पाहिजे.' अशा भावना व्यक्त केल्या. संपूर्ण सभागृहाने  छत्रपती शाहू महाराज की जय अशा घोषणा दिल्या. आयुक्त भारुड यांनी शाळेमध्ये फलकावर शिक्षकांच्या जातीचा उल्लेख होणार नाही असे आदेश देत आहे असे सांगितले. दरम्यान नगरसेवकांनी सभागृहात जो फलक दाखविला त्या फलकावरती जातीचा उल्लेख  नसून प्रवर्गाचा उल्लेख दिसत आहे. एससी, एसटी, ओबीसी असा उल्लेख आढळतो. महापालिकेच्या बहुतांश शाळेमध्ये शिक्षकांच्या नावासमोर ते कोणत्या प्रवर्गातील आहेत त्या प्रवर्गाचा उल्लेख केलेले फलक लावलेले आहेत असे शिक्षकांचे म्हणणे आहे. आणि हे पूर्वीपासून चालत आले आहे असे त्यांचे म्हणणे आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes