राष्ट्रवादी शरद पवार गटातर्फे कँडल मार्च
schedule24 Apr 25 person by visibility 80 categoryराजकीय

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा व शहर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार ) पक्षातर्फे जम्मू काश्मीर येथील अतिरेक्यांच्या भ्याड हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या भारतीय नागरिकाना बिंदू चौक येथे कॅन्डल मार्च करून श्रद्धांजली वाहण्यात आली. तसेच अतिरेक्यांच्या भ्याड हल्ल्याचा निषेध करण्यात आला.
सुरक्षा व्यवस्थेतील गलथानपणाबाबतची उत्तरेही सरकारने तातडीने द्यावीत. अतिरेक्यांच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडणारे सर्वजण भारतीय होते ही भावना कायम ठेवून अशा भ्याड हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर देण्याची गरज आहे. याबाबींचा गांभीर्याने विचार करून त्याचाही सोक्षमोक्ष लावला पाहिजे. केवळ धार्मिक कुटुता ठेवून राजकीय लाभ उठविण्याचा प्रयत्न केला जाऊ नये. असे मनोगत राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष व्ही बी पाटील व कार्याध्यक्ष अनिल घाटगे यांनी व्यक्त केले. यावेळी सुनील देसाई, बाजीराव खाडे, पद्मा तिवले, निरंजन कदम, विनय कदम, रामराज बदले, महादेव पाटील सुरेश कुरणे, अंजली पोळ, अरुणा पाटील, मंगल कट्टी, श्रीकांत पाटील गणेश जाधव, अमोल जाधव, गणेश नलावडे, नागेश जाधव, फिरोज बागवान, राजवर्धन यादव, रियाज कागदी, हिदायत मणेर, अविनाश माने, सुनील सावर्डेकर सदानंद कवडे, सरिता चव्हाण, छाया नलवडे, शशिकला नाईक, शैला आठवले, शहाजी सिद्ध, सुरेंद्र माने, प्रकाश पवार, शशिकांत कदम उपस्थित होते.