बांधकाम व्यावसायिक व्ही. बी. पाटील यांची रविवारी प्रकट मुलाखत
schedule26 Apr 25 person by visibility 84 categoryउद्योग

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : येथील प्रसिध्द बांधकाम व्यावसायिक आणि गायन समाज देवल क्लबचे अध्यक्ष व्ही. बी. पाटील यांची रविवारी, (२७ एप्रिल २०२५) प्रकट मुलाखत घेण्यात येणार आहे. ११७ व्या ‘अक्षरगप्पा’मध्ये अक्षर दालन आणि निर्धार यांच्यावतीने ही मुलाखत सायंकाळी ५ वाजता कोळेकर तिकटीवरील अक्षर दालन येथे घेण्यात येणार आहे. बांधकाम व्यावसायिक म्हणून ओळख असलेल्या व्ही. बी. पाटील यांनी गेल्या ५० वर्षात देवल क्लब, रोटरी, शाहू ब्लड बॅंक, कुस्ती संघटना, बालकल्याण संकुलसह अनेक सामाजिक संस्थांमध्ये उल्लेखनीय काम केले आहे. राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्यावरील दूरचित्रवाणी मालिका निर्मितीच्या कार्यात त्यांनी कार्यकारी अध्यक्ष म्हणून मोठी जबाबदारी पार पाडली होती. या सर्व बाबींवर या प्रकट मुलाखतीच्या निमित्ताने प्रकाशझोत टाकण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला उपस्थित रहावे असे आवाहन संयोजक रवींद्र जोशी यांनी केले आहे.