भाऊसाहेब गलांडे, हरिष धार्मिक, मल्लिकार्जुन मानेंना पदोन्नती
schedule23 Apr 25 person by visibility 125 categoryजिल्हा परिषद
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : राज्य सरकारने उपजिल्हाधिकारी पदावरील अधिकाऱ्यांना अपर जिल्हाधिकारी म्हणून पदोन्नती दिली आहे. यामध्ये करवीर विभागाचे प्रांताधिकारी हरिष धार्मिक यांची बीडच्या अपर जिल्हाधिकारीपदी बदली झाली. कोल्हापुरात यापूर्वी करवीर प्रांताधिकारी, निवासी उपजिल्हाधिकारीपदावर काम केलेले भाऊसाहेब गलांडे यांची रत्नागिरी येथे अपर जिल्हाधिकारीपदी बदली झाली. सांगलीच्या अपर जिल्हाधिकारीपदी सुशांत खांडेकर, तत्कालिन पुनर्वसन अधिकारी अश्विनी जिरंगे यांची बदली आंबेजोगाईला झाली. गडहिंग्लजचे प्रांताधिकारी मल्लिकार्जुन माने यांची सातारा जिल्ह्याचे अपर जिल्हाधिकारीपदी पदोन्नती झाली आहे. दरम्यान राज्य सरकारने राज्यातील ८१ अधिकाऱ्यांना अपर जिल्हाधिकारीपदी पदोन्नती दिली आहे.