भाजप करणार महापालिकेसाठी ४५ जागावर दावा, काँग्रेसने जिंकलेल्या जागेवर लक्ष !
schedule09 Aug 25 person by visibility 65 categoryराजकीय

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : महापालिका, जिल्हा परिषदेसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती म्हणून आम्ही सगळे एकत्र लढविणार आहोत. महायुती सरकारवरील लोकांचा विश्वास पाहिला की महापालिकेचा महापौर, जिल्हा परिषदेचा अध्यक्ष हा महायुतीचा होईल याची खात्री आहे. दरम्यान कोल्हापूर महापालिका निवडणुकीत भाजपा ४५ जागावर दावा करणार आहे. असे खासदार धनंजय महाडिक यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. भाजपचा महापौर होईल असा दावाही त्यांनी केला. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी आठ गावासह कोल्हापूर महापालिकेची हद्दवाढ होणार हे निश्चित असल्याचे त्यांनी सांगितले.
महाडिक म्हणाले ‘महापालिकेच्या गेल्या निवडणुकीत भाजप व ताराराणी आघाडीने ३३ जागा जिंकल्या होत्या. या ३३ जागांवर आमचा दावा भक्कम आहे. याशिवाय काँग्रेसने २९ जागा जिंकल्या होत्या. त्या जागांचे महायुतीमध्ये वाटप करताना २९ पैकी १२ जागा भाजपाला मिळाव्यात असा आमचा आग्रह राहील. भाजपने जिंकलेल्या ३३ आणि काँग्रेसने जिंकलेल्या जागापैकी बारा अशा एकूण ४५ जागा मिळाव्यात यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. ‘महायुतीमधील प्रत्येक पक्षाला आपला महापौर व्हावा असे वाटणे साहजिकच आहे. शिवसेनेचे मंत्री उदय सामंत हे वरिष्ठ मंत्री आहेत. त्यांनी पक्षाच्या मेळाव्यात शिवसेनेचा महापौर होणार असे म्हणणे काही गैर नाही. शहरात शिवसेनेचे आमदार आहेत. आमदार राजेश क्षीरसागर ही जादा जागा मिळवण्यासाठी, जिंकण्यासाठी प्रयत्नशील करणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाने गेल्या निवडणुकीत १४-१५ जागा जिंकल्या होत्या.’
यंदा आम्ही शत-प्रतिशत भाजप म्हणून निवडणूक लढविणार आहोत. महायुतीच्या नेते मंडळींनी फॉर्म्युला निश्चित केला आहे. महायुती म्हणून आम्ही या निवडणुका ताकतीने लढवू आणि जिंकू. महापालिकेत महायुतीत सत्ता आणि भाजपचा महापौर होण्यात काही अडचणी वाटत नाहीत. ’असेही ते म्हणाले. नजीकच्या काळता भाजपमध्ये मोठया संख्येने प्रवेश होणार आहेत. असेही महाडिक यांनी सांगितले. शाहू साखर कारखान्याचे प्रमुख् समरजितसिंह घाटगे हे भाजपात प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे याकडे पत्रकारांनी लक्ष वेधल्यावर त्याविषयी मला काही माहिती नाही असे सांगितले.