इशरे कोल्हापूर चॅप्टरच्या अध्यक्षपदी अवेस अहमद हुसैनी, सचिवपदी विजय पाटील
schedule28 Apr 25 person by visibility 156 categoryउद्योग

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : इंडियन सोसायटी ऑफ हीटिंग रेफ्रिजरेशन अँड एअर कंडिशनिंग इंजिनिअरिंग अर्थात इशरे या संस्थेच्या कोल्हापूर चॅप्टरच्या अध्यक्षपदी अवेस अहमद हुसैनी यांनी नियुक्ती करण्यात आली. चॅप्टरचा १८ वा पदग्रहण आणि शपथविधी सोहळा रविवारी हॉटेल रेडियंट कोल्हापूर येथे पार पडला. यामध्ये प्रेसिडेंट ईलेक्ट म्हणून योगेश दत्तात्रय गांधी यांची नियुक्ती झाली. सचिवपदी विजय पाटील, खजानिसपदी रंगराव एकल ,संचालक म्हणून रमेश पोवार, विजय निपाणीकर, कैवल्य करंडे, केदार गुजर , शशिकांत सनगर, आबिद मुजावर सचिन कांबळे काम पाहणार आहेत. यकाप्रसंगी एजाज काझी, प्रमोद पुंगावकर व मुंबई चॅपटर अध्यक्ष जयंत पाटेकर यांची प्रमुख उपस्थिती होती.