मंत्री मुश्रीफांच्या हस्ते गाभ सिनेमाचे चित्रपटाचे लेखक, निर्मात्यांचा सत्कार
schedule11 Aug 25 person by visibility 132 categoryसामाजिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते कागलमध्ये पुरस्कारप्राप्त "गाभ" चित्रपटाचे लेखक- दिग्दर्शक अनुप जत्राटकर व निर्माते मंगेश गोटूरे यांचा सत्कार झाला. वास्तवदर्शी ग्रामीण चित्रपटाच्या निर्मितीबद्दल मंत्री श्री. मुश्रीफ यांनी लेखक- दिग्दर्शक, निर्माते आणि सर्व कलाकारांचे कौतुक केले. कोल्हापूरच्या मातीतला विषय घेऊन इथल्याच कलाकारांनी निर्माण केलेल्या 'गाभ' चित्रपटाने ६० व्या राज्य मराठी चित्रपट पुरस्कार सोहळ्यात दोन पुरस्कार पटकावले. या चित्रपटाला "कै. दादा कोंडके ग्रामीण प्रश्न हाताळणारा सर्वोत्कृष्ट चित्रपट" व लेखक-दिग्दर्शक अनूप जत्राटकर यांना "कै. अनंत माने ग्रामीण प्रश्न हाताळणारा सर्वोत्कृष्ट चित्रपट दिग्दर्शक" असे दोन पुरस्कार मिळाले. यावेळी केडीसीसी बँक संचालक प्रताप माने, शिवाजी विद्यापीठाचे जलसंपर्क अधिकारी आलोक जत्राटकर, विकास पाटील, पंकज खलीप आदी मान्यवर उपस्थित होते.