एसआयआरच्या कामासाठी गैरहजर , जिपच्या चार कर्मचाऱ्यांवर गुन्हा
schedule23 Jul 26 person by visibility 81 categoryजिल्हा परिषद
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : मतदार यादी सखोल पुनरिक्षण (एसआयआर) कार्यक्रमाची जबाबदारी टाळणाऱ्या जिल्हा परिषदेच्या चार कर्मचाऱ्यांवर शाहूपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. माध्यमिक शिक्षण विभागाचे वरिष्ठ सहायक संजय रणदिवे, ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कनिष्ठ सहायक सुशांत धोंडिराम सुर्यवंशी, शिक्षण विभागाचे शिपाई सुनील मिसाळ, राजू रामचंद्र वडर अशी त्यांची नावे आहेत.एसआयआरची जबाबदारी असताना हे चौघे कर्मचारी गैरहजर राहिले. यासंबंधी त्यांना नोटीस बजावली होती. त्यालाही त्यांनी प्रतिसाद दिला नसल्याच्या कारणास्तव महसूल सहायक राजेंद्र माळी यांनी शाहूपुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. या चारही कर्मचाऱ्यांच्याकडे कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातील मतदार याद्यांचे निरीक्षण करण्याचे काम सोपविले होते.