Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
केएमटी कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाच्या धर्तीवर सुधारित वेतनश्रेणी ! नगरविकासचा आदेश !!तिरुपती बालाजी येथे महाराष्ट्र सदन स्थापन करा, राजेश क्षीरसागरांची मुख्यमंत्र्यांच्याकडे मागणीबदली टप्पा क्रमांक सहामधील शिक्षकांना शाळांचा प्राधान्यक्रम नोंदविण्याची सुविधा २१ ऑगस्टपासून कोल्हापुरात  बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजनसहाय्यक प्राध्यापक- शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या भरतीबाबत लवकरच प्रक्रिया-मंत्री चंद्रकांत पाटील न्यू वूमेन्स कॉलेज ऑफ फार्मसीमध्ये नेत्ररोग तपासणी शिबिरकोल्हापुरात 19 ऑगस्ट रोजी राज्यस्तरीय वीज परिषद, वीज दरवाढीच्या विरोधात ठरणार आंदोलनाची दिशाकॉमर्स कॉलेजमध्ये डॉ. रंगनाथन यांची जयंती साजरीगोकुळ करणार आईस्क्रिम अन् चीज निर्मिती ! गडहिंग्लजला उभारणार म्हैस विक्री केंद्र !!शिक्षक संघ थोरात गटाची कोल्हापूर शहर कार्यकारिणीची घोषणा

जाहिरात

 

कोल्हापुरात उभारणार मराठी सिने कलाकारांचे म्युझियम, चित्रनगरीत चित्रपट शिक्षण केंद्र- मंत्री आशिष शेलार

schedule28 Jun 25 person by visibility 483 categoryलाइफस्टाइल

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर  : ‘महाराष्ट्राची कलानगरी म्हणून कोल्हापूरची ओळख आहे.  चित्रनगरीत फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट (एफटीआय) यांच्या सहकार्याने कोल्हापूरसह महाराष्ट्रातील तरुणांना चित्रपट व्यवसाय, तंत्रज्ञान आणि ऑडिओ-व्हिडिओ यासंबंधीचे प्रशिक्षण सुरू करणार आहोत. आणि या चित्रपट शिक्षण व्यवस्थेची सुरुवात याच वर्षी होणार आहे. त्याचबरोबर कोल्हापुरात जन्मलेल्या आणि कोल्हापूरमध्ये येऊन मराठी सिनेमासाठी कार्य केलेल्या कलाकारांनी मराठी सिनेमाची परंपरा समृद्ध केली असल्याचे सांगून त्यांनी अशा कलाकारांचे कलात्मक दालन (संग्रहालय) या ठिकाणी उभारण्याची घोषणा सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी केली. 

स्थानिक आमदार अमल महाडिक यांच्या पाठपुराव्यातून कोल्हापूर चित्रनगरीतील नव्याने बांधण्यात आलेल्या चित्रीकरणासाठी आवश्यक विविध इमारतीचे उद्घाटन झाले. तसेच, पोस्ट प्रोडक्शनसाठी आवश्यक दुमजली इमारतीचे भूमिपूजनही करण्यात आले. याप्रसंगी आयोजित कार्यक्रमात मंत्री शेलार बोलत होते. पालकमंत्री प्रकाश आबिटकर, खासदार धनंजय महाडिक, आमदार अमल महाडिक, आमदार राहुल आवाडे,महाराष्ट्र चेंबर  ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजचे अध्यक्ष ललित गांधी,  व्यवस्थापकीय संचालक विभीषण चवरे, भाजपचे प्रदेश सचिव महेश जाधव, महानगर जिलहाध्यक्ष विजय जाधव आदी उपस्थित होते.

मंत्री शेलार म्हणाले, चित्रपट निर्मितीसमोर कलात्मकता, सृजनशीलता तसेच तंत्रज्ञानाची अनेक आव्हानं असून या तंत्रज्ञानाची मागणी जगभर आहे. म्हणूनच कोल्हापूर चित्रनगरीत पोस्ट प्रोडक्शनसाठी उच्च दर्जाचे तंत्रज्ञान येत्या काळात उभे राहणार आहे.  पालकमंत्री प्रकाश आबिटकर म्हणाले, कोल्हापूर चित्रनगरीला वास्तविक स्वरूप देण्यासाठी सांस्कृतिक कार्यमंत्री आणि आमदार अमल महाडिक यांनी मोलाचे योगदान दिले आहे. कलानगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोल्हापूर शहरासाठी ही वास्तू भविष्यात अधिक चांगल्या पद्धतीने उभी राहील, यासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न करूया. ही चित्रनगरी पाहण्यासाठी लोक तिकीट काढून येतील.

खासदार धनंजय महाडिक  म्हणाले,  चित्रपटसृष्टीचा व्यवसाय वाढत असून रोजगारसंख्याही वाढत आहे, यामुळे कलाकार या क्षेत्राकडे आकर्षित होत आहेत. कोल्हापुरात सरकारने अॅक्टिंग स्कूल सुरू करावे. जेणेकरुन कलाचळवळीला चालना मिळेल. आमदार अमल महाडिक यांनी चित्रनगरीच्या उभारणीसाठी अनेक मान्यवरांचे योगदान लाभल्याचे सांगून, सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार यांच्या सहकार्याने पुणे, मुंबई यासह रामोजी फिल्म सिटीपेक्षा अधिक चांगली आणि सुसज्ज चित्रनगरी कोल्हापूर येथे उभी राहत असल्याचे सांगितले. प्रास्ताविक व्यवस्थापकीय संचालक विभीषण चवरे यांनी केले.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes