सिद्धेशचा मृत्यू अपघातस्थळी नव्हे ! उपचाराअभावी पाऊण तास तडफड, रुग्णवाहिका, ऑक्सिनजही वेळेत नाही !!
schedule23 Apr 25 person by visibility 196 categoryगुन्हे

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : आजरा तालुक्यातील माद्याळनजीक झालेल्या अपघातामधील मृत बाइक रायडर सिद्धेश विलास रेडेकर या तरुणाचा मृत्यू अपघातस्थळी झाला नाही. अपघातानंतर जवळपास पाऊणतास सिद्धेशवर उपचार झाले नाहीत. वेळेवर रुग्णवाहिका मिळाली नाही. उपचाराअभावी ४५ मिनिटे तडफड झाली अशी धक्कादायक माहिती पुढे आली आहे. अपघाताचा प्रसंग हेल्मेटमधील कॅमेऱ्यात चित्रीत झाला आहे.
सिद्धेशचा अपघात साधारण - ११:३५ सकाळी झाला. त्याची दुचाकी समोरुन येणाऱ्या मोटारीला धडकली. अपघातानंतर त्यांच्या मित्रानी सिद्धेशच्या कुटुंबीयांना फोन केला. रुग्णवाहिकेला फोन केला. मात्र कोणत्याही ठिकाणाहून रुग्ण्वाहिका मिळाली नाही. त्याच्यासोबतच्या मित्रांनी, स्थानिकांच्याकडून खाजगी रुग्णवाहिकेचाचा नंबर घेऊन रुग्णवाहिका बोलावली. स्थानिक रुग्णवाहिका दुपारी सव्वा बारा ते बारा वाजून वीस मिनिटाच्या आसपास अपघातस्थळी पोहोचली. मात्र त्या रुग्णवाहिकेत ऑक्सिजन नव्हते. तेव्हा शासकीय प्राथमिक आरोग्य केंद्र आजरा रुग्णालल येथे रुग्ण्वाहिका पोहोचली. त्या ठिकाणीही ऑक्सिजनची सुविधा नव्हती.
‘ तिथे मुख्य डॉक्टरच हजर नव्हते. नातेवाईकाचे लग्न असल्यामुळे ते बाहेर होते का कदाचित रजेवर होते की असेच गेले ते माहीत नाही त्या प्राथमिक उपचारचा काही उपयोग झाला नाही असे सिद्धेशच्या कुटुंबीयांचे म्हणणे आहे. प्रत्यक्ष उपचारास यामुळे विलंब झाला. शिवाय डॉक्टर नसल्यामुळे गडहिंग्लजला नेण्याचा सल्ला देण्यात आला. दरम्यान सिद्धेशलाखाजगी रुग्णालयामध्ये दाखल केले. मात्र प्रतिसाद मिळत नाही हे समजताच तिथून कोल्हापूरला हलविण्यचे ठरले. दाखल करण्यासाठी रस्त्यावरती ये जा करणाऱ्या कोणीही मदत केली नाही. यामुळे उपचारास विलंब होत गेला. सिद्धेशचा मृत्यू, हा केवळ सरकारी प्राथमिक आरोग्य केंद्र निष्काळजीपणा व आजरा येथे पोलिसांनी वेळ वाया घालवण्याची प्रक्रिया, अपघातग्रस्तांचे प्राण वाचवणे ऐवजी पंचनामेमध्ये जास्त रस नंतर दोन तासांनी खाजगी रुग्णालयात उपचार त्यानंतर सिद्धेशच्या मृत्यूचे हे मुख्य कारण असल्याचे कुटुंबीयांचे म्हणणे आहे.
……………
आरोग्य यंत्रणा सक्षम करायला हवी
‘ अशा घटना टाळण्यासाठी आणि इतरांचे जीव वाचवण्यासाठी सरकारच्या सर्व यंत्रणा सुधारायला पाहिजेत. दोन ते सव्वा दोन तास रुग्णवाहिका किंवा उपचार मिळत नाहीत. सरकारकडून आरोग्य यंत्रणेवर इतकी रक्कम खर्च करून देखील सक्षम अशी आरोग्य यंत्रणा नाही नुसता रस्त्याचा विकास करुन नव्हे तर आरोग्य यंत्रणा सक्षम करायला हवी.’अशा भावना आता व्यक्त होत आहेत.