व्यापार - उद्योग वृद्धीसाठी चेंबर ऑफ कॉमर्स -केआयटीमध्ये सामंजस्य करार
schedule11 Aug 25 person by visibility 84 categoryउद्योग

महाराष्ट्र न्यूज वन : कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज व केआयटी कॉलेज चे इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट एज्युकेशन अँड रिसर्च यांच्यात व्यापार-उद्योग वृध्दीबाबत सामंजस्य करार करण्यात आला. या कराराचा फायदा विद्यार्थ्यांच्या पुढील शिक्षणासाठी व त्यांच्या शोधप्रबंधासाठी आणि व्यापारी-उद्योगांच्या वृध्दी साठी निश्चितच होईल असा आशावाद केआयटी कॉलेजचे प्रा. डॉ. एस. एम. खाडीलकर यांनी व्यक्त केला. ते पुढे म्हणाले, या करारानुसार व्यापारी-उद्योजकांना व्यापार-उद्योग करताना येणाऱ्या अडचणी व त्यावर उपाय यावर केआयटी कॉलेजचे विद्यार्थी प्रोजेक्ट रिपोर्ट तयार करतील. विद्यार्थी प्रोजेक्ट रिपोर्ट करत असताना ते वेगेवेगळ्या आस्थापनांत जावून ग्राहकांना सेवा देताना त्यांच्या आस्थापना मालकांकडून असणाऱ्या अपेक्षा समजावून घेऊन आपल्या प्रशासन समितीला त्याचा अहवाल देईल व ती समिती त्या त्या आस्थापनांतील मालकांना त्याची परिपूर्ण माहिती देवून ग्राहकांना आपल्याकडून असणाऱ्या अपेक्षा व अडचणी मांडतील.
चेंबरचे अध्यक्ष संजय शेटे यांनी कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज व केआयटी कॉलेज चे इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट एज्युकेशन अँड रिसर्च यांच्यात यापूर्वी देखील सामंजस्य करार करण्यात आला होता असे सांगून विद्यार्थ्यांचा प्रोजेक्ट रिपोर्ट यशस्वी होणेसाठी कोल्हापूर चेंबर जरुर ते सहकार्य करेल असे सांगितले.
यावेळी चेंबरच्या संचालिका माजी आमदार जयश्री जाधव, माजी अध्यक्ष आनंद माने, प्रदीप कापडिया, मानद सचिव प्रशांत शिंदे, अजित कोठारी, वैभव सावर्डेकर, खजानिस राहुल नष्टे, केआयटी कॉलेजच्या डिन अकॅडेमीक्स डॉ. आर. पी. शिंदे मॅडम, फॅकल्टी मेंबर आर. ए. जोशी उपस्थित होते.