Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
विवेकानंद कॉलेज हे गुणवत्तेचे मानदंड - प्राचार्य अभयकुमार साळुंखे सुप्रीमच्या आदेशाचे पदाधिकाऱ्यांकडून स्वागत, निवडणुकीमुळे कार्यकर्त्यांना संधी मिळणारअंबाबाई मंदिर विकास आराखडा १४४५ कोटीचा, जोतिबा विकास आरखडयासाठी २५९ कोटीचाबार असोसिएशनमध्ये गटतट न आणता खंडपीठाचा लढा यशस्वी करू – नूतन पदाधिकारी-कार्यकारिणीकडे पदभार सुपूर्दस्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुका चार महिन्यात घ्या, सुप्रीम कोर्टाचा आदेशटॉप वीस शिक्षकांमध्ये पदवीधर शिक्षिका अर्चना सुतार, कविता सरदेसाई !कुशिरेच्या ज्योती चव्हाणचे बारावी परीक्षेत लख्खं यशबारावी परीक्षेत विवेकानंद कॉलेजच्या गुणवत्तेची परंपरा कायमगोखले कॉलेजचा बारावीत विज्ञान शाखेचा निकाल शंभर टक्केप्रशासनाची अॅक्शन, प्रदीप हुपरे निलंबित ! सदाशिव येजरेंचा कबुलीनामा !!

जाहिरात

 

प्रज्ञाशोध परिक्षेत २६ विद्यार्थी बक्षीस पात्र

schedule26 Mar 25 person by visibility 120 categoryजिल्हा परिषद

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा परिषेदच्या प्राथमिक शिक्षण विभागातर्फे बॅरिस्टर बाळासाहेब खर्डेकर प्रज्ञाशोध परीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षेत जिल्हा व तालुका स्तरावर मिळून एकूण २६ विद्यार्थी बक्षीस पात्र ठरले आहेत. या यशस्वी विद्यार्थ्यांना रोख रक्कम, प्रशस्तीपत्रक देऊन गौरविण्यात येणार आहे अशी माहिती प्राथमिक शिक्षणाधिकारी मीना शेंडकर यांनी दिली आहे.

बक्षीसास पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांमध्ये स्वानंदी पाटील, स्वयंभू तेली, मनस्वी अलंकार, ओवी पाटील, सागरिका भोगम, ओमराजे कदम, राजवीर चौगले, पीयुष पाटील, प्रत्युष पाटील, प्रगती लगारे, राधिका पाटील, वेदिका भोसले, श्रेयान वागरे, विभावरी पाटील, मनाली पाटील, राजवीर महेकर, अनुष्का पाटील, आदेश पाटील, अर्णव गावडे, पूर्वा माळवेकर, अब्दुर्रहमान पटेल, अब्दुला जमादार, अलीना पटेल, मुहम्मद अनस शेख, मिसबा काझी, अन्सीबा मुल्लानी यांचा समावेश आहे.

जिल्हा परिषदेच्या शाळांमधील इयत्ता चौथी आणि सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी प्रज्ञाशोध परीक्षा झाली होती. पहिल्यांदा चाळणी परीक्षा झाली. या परीक्षेला एकूण ४४ हजार ९८० विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. या विद्यार्थ्यामधून गुणानुक्रमे मराठी माध्यमातील इयत्ता चौथीसाठी प्रत्येक तालुक्यातून २०० आणि सातवीसााठी शंभर विद्यार्थी निवडले. उर्दू माध्यमातील चौथी आणि सातवीसाठी प्रत्येक शंभर विद्यार्थी निवडले. एकूण ३८७९ विद्यार्थ्यांची परीक्षा नऊ मार्च रोजी घेण्यात आली होती.

हमिदवाडा कारखान्याच्या बिनविरोध निवडणुकीसाठी

schedule22 May 23 person by visibility 369 category

*हमिदवाडा कारखान्याची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध व्हावी..* ......

 *राजे समरर्जीतसिंह घाटगे यांचे प्रसिद्धी पत्रक* 

 *गट- तट न मानता बिनविरोधासाठी सर्वांनी सहकार्य करणेचे आवाहन* 


कागल प्रतिनिधी दिनांक

लोकनेते सदाशिवराव मंडलिक कागल तालुका स.सा.कारखाना हमिदवाडा-कौलगे या साखर कारखान्याची 2023-28 या वर्षांकरिता निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे.कारखान्याची ही पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध करण्यासाठी जाहीर पाठिंबा देत असलेचे पत्रक भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजे समरजीतसिंह घाटगे यांनी प्रसिद्धीस दिले आहे.
            
 स्व.खास. सदाशिवराव मंडलिक साहेब संस्थापक असलेला हा साखर कारखाना त्यांच्या आशीर्वादाने व खा.संजयदादा मंडलिक यांच्या नेतत्वाखाली चांगला व सुरळीतपणे सुरू आहे.त्यामुळे या कारखान्याची होऊ घातलेली पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध व्हावी त्यासाठी आमचे सर्वोतोपरी सहकार्य राहील.

 "विना सहकार,नाही उद्धार" हे ब्रीद उराशी बाळगून स्व.राजे विक्रमसिंह घाटगे आणि स्व.खास. सदाशिवराव मंडलिक साहेब यांनी जिल्ह्याच्या समाजकारणात आणि राजकारणात अत्यंत प्रामाणिक आणि नम्रपणे सहकार खोलवर रुजविला आहे .ही बाब तर सर्वश्रुतच आहे. तसेच कोणतीही सहकारी संस्था जर आर्थिक दृष्ट्या सक्षम व्हावयाची असेल तर त्या संस्थेवर होणारा अनावश्यक खर्च टाळला पाहिजे. विशेषतः निवडणुकीवर होणारा वारेमाप खर्च हा कोणत्याही सहकारी संस्थेस आर्थिक दृष्ट्या परवडणारा नसतो, त्यामुळे सहकारी संस्थांच्या निवडणुका बिनविरोध करण्याकडे त्यांचा कल होता.

त्या अनुशंगाने बहुजनांच्या या श्रम मंदिराची होऊ घातलेली पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध करणेसाठी इतर सर्वांनीही सहकार्य करावे असे आवाहन ही प्रसिद्धी पत्रकातून श्री घाटगे यांनी केले आहे.

समरजित घाटगे हे पाऊस माझ्यामुळेच पडला म्हणतील मंडलिक गटाची बोचरी टीका

schedule26 Aug 22 person by visibility 545 category

*चर काढल्यामुळेच चिकोत्रा प्रकल्प भरल्याची बालिश विधाने करू नका........*                  

      
*"बालिश विधाने करत जनतेची करमणूक करू नका...."*
           
*"शशिकांत खोत यांचा समरजीत घाटगेना सल्ला...."*
        
सेनापती कापशी, दि. २६:
आपण चर काढल्यामुळेच चिकोत्रा प्रकल्प भरला अशी बालिशपणाची वक्तव्ये करून जनतेची करमणूक करू नका, असा सल्ला माजी पंचायत समिती सदस्य शशिकांत खोत यांनी नाव न घेता समरजीत घाटगे यांना दिला आहे. कदाचित पाऊसही माझ्यामुळेच पडला, असेही म्हणाल, असा टोलाही श्री. खोत यांनी या पत्रकात लगावला आहे.     
           
या पावसाळ्यात चिकोत्रा प्रकल्प भरल्याच्या पार्श्वभूमीवर श्री. घाटगे यांनी प्रकल्पाला भेट देऊन आपण चर काढल्यामुळे तो भरला, असा दावा केला होता. त्याला श्री. खोत यांनी उत्तर देताना पुढे म्हटले आहे, यावर्षी पाऊस ४०० मिलिमीटर कमी पडला असला तरी प्रकल्पात ४५ टक्के इतका शिल्लक पाणीसाठा होता. त्यामुळेच प्रकल्प तुडुंब भरला आहे. ही वस्तुस्थिती दडवून समरजीत घाटगे स्वतःचे हसे करुन घेत आहेत.
           
पत्रकात श्री. खोत यांनी पुढे म्हटले आहे, गेली तीन वर्षे सलग चांगला पाऊस होत असल्यामुळे जिल्ह्यातील सर्व धरणे १००% भरत आहेत. चिकोत्रा धरण ज्या- ज्या वेळी भरले नाही, त्यावेळी पाऊस कमीच पडला आहे.
           
गेल्यावर्षी म्हणजेच सन २०२१ मध्ये सुद्धा १७२८ मिलिमीटर पाऊस पडून धरण भरले होते. पाऊस १७०० मिलिमीटरपेक्षा कमी व धरणामध्ये २५ टक्के पेक्षा कमी पाणीसाठा असलेस धरण भरले जात नाही. कदाचित, तीन वर्षे मीच पाऊस पडला असे बालिश विधान करत जनतेची करमणूक करु नका. त्यामुळेच म, अद्याप परिपक्वपणा आला नसल्याचेच हे द्योतक आहे, असेही पत्रकात पुढे म्हटले आहे.
       
*"ही घ्या पाऊसमानाची अधिकृत आकडेवारी......."*
२०१२ ला ७९ टक्के पाणीसाठा शिल्लक होता, १७२० मिलिमीटर पाऊस झाला.
२०१४ ला ०.३२ टीएमसी पाणीसाठा शिल्लक होता, १७६७ मिलिमीटर पाऊस झाला. धरण ७७ टक्के भरले.
२०१५ ला ०. २८ टीएमसी पाणीसाठा शिल्लक होता, १२५७ मिलिमीटर पाऊस झाला. धरण ४८ टक्के भरले.
२०१६ ला ०.२८ टीएमसी पाणीसाठा शिल्लक होता, २०६५ मिलिमीटर पाऊस झाला. धरण ६१ टक्के भरले.
२०१७ ला ०.१६ टीएमसी पाणीसाठा शिल्लक होता, २०१८ ला ०.१८ पाणीसाठा शिल्लक होता, २७४१ मिलिमीटर पाऊस झाला. धरण १०० टक्के भरले.
त्यानंतर सलग तीन वर्षे पाऊस मोठ्या प्रमाणात झाला.
२०१९ ला ०.४० टीएमसी पाणीसाठा शिल्लक होता, ४१६७ मिलिमीटर पाऊस झाला. धरण १०० टक्के भरले.
२०२० ला ०.४६ टीएमसी पाणीसाठा शिल्लक होता, २१७५ मिलिमीटर पाऊस झाला. धरण १०० टक्के भरले
२०२१ ला ०.४० टीएमसी पाणीसाठा शिल्लक होता, २५०२ मिलिमीटर पाऊस झाला. धरण १०० टक्के भरले
यावर्षीही म्हणजेच २०२२ ला ४५ टक्के पाणीसाठा शिल्लक होता आणि झालेल्या जोरदार पावसामुळे धरण शंभर टक्के भरले आहे.
===================

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes