Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
अभिनेते अरुण सरनाईक यांच्यावर माहितीपट, रविवारी प्रीमियअर शोश्री महालक्ष्मी अन्नछत्रचा राष्ट्रीय पातळीवर सन्मान, भारत सरकारकडून प्रमाणपत्र प्रदानसलग दुसऱ्यांदा एटी स्पोर्ट्स लिंगायत प्रीमिअर लीगचा मानकरी ! बॅटरी पॉवर सोल्युशन्स उपविजेते !!कुलगुरुनंतर पुढे काय ? या प्रश्नावर डी. टी. शिर्के म्हणाले माझ्यासमोर एक मोठा....जिपमध्ये आता जीपीएफ ऑनलाइन, मोबाइल अॅपद्वारे कळणार प्रॉव्हिडंड फंडाचे स्टेटससंशोधकांनी जिथे समस्या आहेत त्या ठिकाणी संशोधनाला प्राधान्य द्यावे-डॉ. अभय बंगशहरातील वाहतूक-पार्किंगला शिस्त लागणार, सुट्टीच्या दिवशी शाळांच्या मैदानावर पे अँड पार्क !डीवाय पाटील अभियांत्रिकीचा चार दशकांचा प्रवास अभिमानास्पद- डॉ. संजय डी. पाटीलहद्दवाढीच्या विरोधात वीस गावांच्या सरपंचांची वज्रमूठ ! कोल्हापुरात बैठक, आबिटकर-मुश्रीफ-क्षीरसागर यांच्यावर निशाणाफैरी झडू लागल्या, प्रभाग रचनेवरुन काँग्रेसचा सत्ताधाऱ्यांवर आरोप

जाहिरात

 

वडणगेत विद्यार्थ्यांच्या स्वागताला खासदार, शाळा प्रवेशोत्सव जल्लोषात

schedule18 Jun 25 person by visibility 62 categoryशैक्षणिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : करवीर तालुक्यातील वडणगे  येथील  शिवाजी विद्या मंदिर आणि कन्या विद्या मंदिर येथे शाळा प्रवेशोत्सव उत्साहात झाला. खासदार धनंजय महाडिक यांनी शाळेला भेट देत विद्यार्थ्यांचे स्वागत केले. विद्यार्थ्यांसोबत त्यांनी सेल्फी घेतला. दरम्यान  ढोल ताशांच्या गजरात आणि हलगीच्या कडकडाटात लेझीम नृत्य सादर करत पारंपरिक वेशभूषत आलेल्या मुलांचे शाळा परिसरात जल्लोषी स्वागत झाले. खासदार महाडिक यांनी गुलाब पुष्प देऊन विद्यार्थ्यांचे स्वागत केले. विद्यार्थ्यांना गणवेश, शैक्षणिक साहित्य  वाटप करण्यात आले.

याप्रसंगी वडणगेच्या सरपंच संगीता पाटील, उपसरपंच उमाजी शेलार, बाजीराव पाटील, तानाजी पाटील, एम. बी. किडगावकर, इंद्रजित पाटील, सर्जेराव पाटील, कृष्णात जौंदाळ, बाबासाहेब पाटील, चिखलीचे सरपंच रोहित पाटील उपस्थित होते. 

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes