डीवाय पाटील अभियांत्रिकीचा चार दशकांचा प्रवास अभिमानास्पद- डॉ. संजय डी. पाटील
schedule19 Jun 25 person by visibility 306 categoryशैक्षणिक
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : ‘डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाची ४ दशकांची वाटचाल अतिशय अभिमानास्पद आहे. या महाविद्यालयाने हजारो अभियंत्यांना घडवले असून ते आज भारतासह जगभर महत्त्वाची भूमिका बजावत आहेत याचे फार मोठे समाधान वाटते,’ असे प्रतिपादन डी. वाय. पाटील प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. संजय डी पाटील यांनी केले.
डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या ४१ व्या व स्कूल ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंटच्या दुसऱ्या वर्धापन दिन कार्यक्रमात डॉ. पाटील बोलत होते. यावेळी विश्वस्त पृथ्वीराज पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. संस्थेचे विश्वस्त ऋतुराज पाटील, पूजा ऋतुराज पाटील आणि कार्यकारी संचालक डॉ. ए. के. गुप्ता यांनी सिंगापूरहून ऑनलाईन माध्यमातून कार्यक्रमात सहभागी होत शुभेच्छा दिल्या. यावेळी डॉ. पाटील यांच्या हस्ते केक कापून वर्धापन दिन साजरा करण्यात आला. आमदार ऋतुराज पाटील म्हणाले, संस्थेच्या प्रगतीमध्ये सर्व सहकाऱ्याचे मोठे योगदान आहे. येत्या काळात सर्वच संस्थामध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून त्या अधिक उंचीवर नेण्यासाठी प्रयत्न करुया. विद्यार्थ्यांच्या गरजा लक्षात घेऊन महाविद्यालयात सातत्याने नव्या सुविधा व अभ्यासक्रम समाविष्ट केले जात आहेत. विद्यार्थी केंद्रित प्रगती, गुणवत्ता, संशोधन यावर अधिक भर देऊ.
डॉ. लीतेश मालदे यानी सूत्रसंचालन केले. डॉ. संतोष चेडे आणि डॉ. अजित पाटील यांनी महाविद्यालयाच्या प्रगतीचा आढावा मांडला. प्रा. आश्विन देसाई यांनी आभार मानले. या कार्यक्रमाला सीएचआरओ श्रीलेखा साटम, अभिमत विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. व्ही. व्ही. भोसले, परीक्षा नियंत्रक अभय जोशी, डॉ. अद्वैत राठोड, प्रा. डॉ. अजित पाटील, प्राचार्य डॉ. संतोष चेडे, रजिस्ट्रार डॉ. एल. व्ही. मालदे, प्रा. आश्विन देसाई, प्रा. रविंद्र बेन्नी, डॉ. महादेव नरके, डॉ. राजेश ख्यालाप्पा, डॉ. वैशाली गायकवाड, संजय जाधव, प्रा. अभिजित मठकर, डॉ. नवनीत सांगळे, प्रा. मकरंद काईगडे उपस्थित होते.