Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
गोकुळच्या चेअरमनपदी राजेश पाटील ! महायुतीचा सतेज पाटलांना धक्का, शशिकांत पाटील पराभूत !!अध्यक्ष निवडीच्या सभेसाठी समविचारी- महायुतीचे संचालक गोकुळमध्ये दाखलअध्यक्षपदासाठी शशिकांत पाटील चुयेकर विरुद्ध अजित नरकेंचे नाव आघाडीवर !गोकुळ अध्यक्ष निवडीत मोठा ट्विस्ट, स्वीकृत संचालकांना मतदानाचा अधिकार ! खंडपीठाचा निर्णय, सत्तेसाठी महायुती सरसावली!!मी समोरून लढणारा माणूस, तुमच्यासारखा पाठीत खंजीर खुपसत नाही - सतेज पाटलांचा हसन मुश्रीफांच्यावर हल्लाबोलमहायुती विरोधात कोल्हापुरात उसळला जनसागर, संघर्ष मोर्चाद्वारे सरकारला इशाराशिक्षकच माझी जात –शिक्षकच माझा धर्म! शिक्षण क्षेत्रासाठी चोवीस तास उपलब्ध !! आमदार कौस्तुभ गावडेकोल्हापुरातील डॉक्टरांचा अनोखा सेवाभाव, भेट म्हणून मिळालेले पाच लाख रुग्णांच्या उपचारासाठीगोकुळसाठी संघर्ष चिघळतोय, शासननियुक्त संचालकांच्या अध्यादेशाला समविचारीचे कोर्टात आव्हानआरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी धनगर बांधवांसमवेत साजरी केली दिवाळी

जाहिरात

 

शिक्षकच माझी जात –शिक्षकच माझा धर्म! शिक्षण क्षेत्रासाठी चोवीस तास उपलब्ध !! आमदार कौस्तुभ गावडे

schedule09 Nov 26 person by visibility 195 categoryशैक्षणिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर-:  ‘ सर्व शिक्षकांनी नातीगोती शोधून काढून मला प्रचंड मतदान  देण्याचे कार्य केले. मत मला बघून न देता सर्व शिक्षकांना बघून दिले आहे. मी ६३ हजार शिक्षकांचा आमदार आहे. आता निवडणूक संपली. शिक्षकांची एकजूट हीच महत्त्वाची आहे.सर्वांची कामे केली जातील. माझी शिक्षकच जात व धर्म असेल. भ्रष्टाचार मुक्त शिक्षण व्यवस्था करण्यासाठी अग्रेसर आहे. शिक्षण क्षेत्रातील कामांच्या सोडवणुकीसाठी २४ तास उपलब्ध आहे.’अशी ग्वाही शिक्षक आमदार कौस्तुभ गावडे यांनी दिली.

स्वाभिमानी सहकार आघाडी व दादासाहेब लाड मित्र परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने त्यांचा सत्कार समारंभ आयोजित केला होता. त्याप्रसंगी ते बोलत होते. हा सत्कार समारंभ मुख्याध्यापक संघाच्या विद्याभवनामध्ये झाला. मान्यवरांच्या हस्ते रोपास पाणी घालून कार्यक्रमाचा प्रारंभ झाला. आमदार गावडे म्हणाले, ‘शिक्षक नेते दादासाहेब लाड यांनी मला आमदार होण्यासाठी मोठी ताकद दिली. त्यामुळेकोल्हापूर जिल्ह्यातील शिक्षकांनी भरभरून मतदान केले. म्हणून शिक्षक आमदार होण्यात यश मिळाले आहे. साऱ्यांचे मार्गदर्शन घेऊनच पुढचे कार्य करीत  राहीन.’

कोल्हापूर जिल्हा शैक्षणिक  व्यासपीठाचे  अध्यक्ष एस. डी. लाड म्हणाले, ‘भाषा, संस्कृती, सामंजस्य त्यांना आजोबा व आईकडून  प्राप्त झाले आहे. आमदार कौस्तुभ गावडेंच्या विजयांने विधान परिषदमध्ये रेकॉर्ड झाले आहे. शिक्षकांची व संस्था चालकांची अनेक प्रलंबीत  कामे आहेत ती पूर्ण करावीत. अनेक शाळांमध्ये शिक्षक नाहीत ज्या त्या वर्षी शिक्षक भरती करण्यास प्रयत्न करावेत.२०१२ पूर्वीच्या शिक्षकांची टाईटी अट्ट रद्द करावी आदी कामी प्रयत्न करावेत.’    शिक्षक नेते दादासाहेब लाड म्हणाले, ‘शिक्षकांची अनेक कामे प्रलंबित आहेत. त्यासाठी अधिकाऱ्यांची बैठक लावून शिक्षकांच्या समस्या सोडवाव्यात हे गरजेचे आहे. शिक्षकांना शिक्षण विभागात चांगली वागणूक मिळावी. स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेने ग्रामीण भागात शिक्षण देण्याचे कार्य केले. त्याचीही तुम्हाला या निवडणूकीत मताच्या रूपाने पुण्याई मिळाली. कमी वयात आपल्याला शिक्षकांच्या प्रश्नांची जाण प्राप्त झाली आहे.’

याप्रसंगी अशोक चराटे, पवन पाटील, अनिल इंगळे, प्रा. मधुकर पाटील यांनी मनोगते व्यक्त केली. प्राचार्य डॉ डी. एस. घुगरे यांनी प्रास्ताविक केले. कार्यक्रमाला चेअरमन राहुल पवार, सचिव आर. वाय.पाटील, बी जी बोराडे, राजाराम वरुटे, बाळ डेळेकर, भरत रसाळे,बाबा पाटील, दत्ता पाटील, सुधाकर निर्मळे, सुरेश संकपाळ, श्रीकांत पाटील, अतुल जोशी, मनोहर पाटील, बी. के. मडिवाळ, शीतल विवेकानंद हिरेमठ, रूतुजा पाटील, राजेंद्र कोरे, राजेंद्र माने उपस्थित होते. शिवाजी पाटील यांनी सूत्रसंचालन केले.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes