Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
करवीर तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेत एआय तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण देणार - सभापती साताप्पा पाटीलविना अनुदानित शाळांच्या टप्पा अनुदान आंदोलनास शैक्षणिक व्यासपीठाचा पाठिंबारविकिरण इंगवलेंचा राजेश क्षीरसागरांच्यावर आरोप, ऋतुराज क्षीरसागरांचा इंगवलेंच्यावर पलटवारवीरशैव बँकेला शेड्युल्ड बँकेचा दर्जा ! कोल्हापुरात रंगला आनंदोत्सव !!टीईटीचा पेपर फुटला, रविवारी होणारी परीक्षा रद्द !  शिक्षकांना धक्का !!मनसेची कोल्हापुरात पुनर्बांधणी, कार्यकर्त्यांशी थेट संवादबीएनआयतर्फे शनिवारी राष्ट्रीय औद्योगिक नेटवर्किंग मेळावा, उद्योग संवाद परिसंवादइतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार यांच्या विचारकार्याचा आदर्श नव्या पिढीने घ्यावा - पालकमंत्री प्रकाश आबिटकरजिल्हा परिषदेत शाहू महाराज जयंती उत्साहात साजरीराजकारण बाजूला ठेवून समविचारी आघाडीसोबत एकत्र या : आमदार सतेज पाटील

जाहिरात

 

करवीर तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेत एआय तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण देणार - सभापती साताप्पा पाटील

schedule27 Jun 26 person by visibility 163 category

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी : सध्याचे जग हे डिजिटल शिक्षणाकडे आकर्षित झालेले आहे.  ग्रामीण भागातील विद्यार्थी यापासून वंचित राहणार नाही म्हणून पंचायत समिती करवीरने एक कोटीचे बजेट  एआय तंत्रज्ञानाच्या प्रशिक्षणासाठी ठेवलेली आहे त्याचा लाभ तालुक्यातील 184 शाळांना होणार आहे असे करवीर पंचायत समितीचे सभापती साताप्पा पाटील यांनी सांगितले. 

लोकवर्गणीतून केंद्र शाळा सडोली खालसा या शाळेतील सर्व विध्यार्थीना स्पोर्ट्स किटचे वितरण सभापती पाटील, पंचायत समिती सदस्य निवास पाटील  सरपंच अमित पाटील, ग्रामपंचायत सदस्य संजय पाटील, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष  विक्रम पाटील, उपाध्यक्ष शिवाजी पाटील, सदस्य पंचम पाटील, रोहन कांबळे, आरोही कांबळे आनंद पाटील यांचे हस्ते वितरण केले.दिवंगत आमदार पी एन पाटील  यांच्या विचाराने काम करणारे आम्ही असून शिक्षणाकडे कोणत्याही प्रकारचे आमचे दुर्लक्ष होणार नाही. सडोली गाव हे राजकीय, शैक्षणिक, सहकार, क्रीडा या सर्व क्षेत्रांमध्ये आघाडीवर असून त्या गावातील विद्यार्थी हे उत्कृष्ट घडावेत असा प्रयत्न ही शाळा करीत आहे ही बाब या गावासाठी  आहे भूषणावह आहे, या शाळेचे मुख्याध्यापक  तथा केंद्राचे केंद्र प्रमुख  सुरेश कांबळे यांनी आपल्या तालुक्यातील शाळा अशाच प्रकारे दर्जेदार व्हावेत यासाठी आम्हास सहकार्य करावे असेही आवाहन केले.

 पंचायत समिती सदस्य निवास पाटील यांनी सडोली केंद्राचे काम हे तालुक्याला दिशादर्शक  आहे, त्यामध्ये बाचणी  शाळेसह केंद्र शाळा सोडली खालसा शाळेचेही काम उल्लेखनीय आहे विद्यार्थ्यांचे हित जोपासण्यासाठी शिक्षकांनी सतत प्रयत्न करावे.
 तंत्रज्ञानाबरोबरच करवीर तालुक्यातील सर्व शाळांमध्ये सेमी इंग्लिश चे वर्ग सुरू करावेत,त्यास पंचायत समितीकडून सर्वतोपरी सहकार्य होईल असेही आश्वासन दिले.इंग्रजीचे शिक्षण ही काळाची गरज असून पालकांचा ओढा खाजगी शाळा कडे जाणारा कमी करण्यासाठी प्रत्येक शाळेने अशा प्रकारचे नियोजन करावे असे आवाहन   केले.केंद्रप्रमुख  सुरेश कांबळे साहेब यांनी शाळेच्या भौतिक सुविधाचा व विद्यार्थी प्रगतीचा आढावा घेतला. आनंद पाटील यांनी स्वागत  केले. शिक्षिका वागरे यांनी आभार मानले.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes