Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
करवीर तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेत एआय तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण देणार - सभापती साताप्पा पाटीलविना अनुदानित शाळांच्या टप्पा अनुदान आंदोलनास शैक्षणिक व्यासपीठाचा पाठिंबारविकिरण इंगवलेंचा राजेश क्षीरसागरांच्यावर आरोप, ऋतुराज क्षीरसागरांचा इंगवलेंच्यावर पलटवारवीरशैव बँकेला शेड्युल्ड बँकेचा दर्जा ! कोल्हापुरात रंगला आनंदोत्सव !!टीईटीचा पेपर फुटला, रविवारी होणारी परीक्षा रद्द !  शिक्षकांना धक्का !!मनसेची कोल्हापुरात पुनर्बांधणी, कार्यकर्त्यांशी थेट संवादबीएनआयतर्फे शनिवारी राष्ट्रीय औद्योगिक नेटवर्किंग मेळावा, उद्योग संवाद परिसंवादइतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार यांच्या विचारकार्याचा आदर्श नव्या पिढीने घ्यावा - पालकमंत्री प्रकाश आबिटकरजिल्हा परिषदेत शाहू महाराज जयंती उत्साहात साजरीराजकारण बाजूला ठेवून समविचारी आघाडीसोबत एकत्र या : आमदार सतेज पाटील

जाहिरात

 

वीरशैव बँकेला शेड्युल्ड बँकेचा दर्जा ! कोल्हापुरात रंगला आनंदोत्सव !!

schedule27 Jun 26 person by visibility 160 categoryउद्योग

नागरी सहकारी बँकांचे देशाच्या विकासात मोठे योगदान - सतीश मराठे
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर :  'नागरी सहकारी बँकांचे देशाच्या विकासात मोठे योगदान आहे, ' असे प्रतिपादन रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे संचालक सतीश मराठे यांनी आज येथे केले.

श्री वीरशैव को-ऑपरेटिव्ह बँकेला नुकताच मल्टिस्टेट शेड्युल्ड बँक दर्जा मिळाला. त्यानिमित्त आनंद भवन सभागृह येथे आनंदोत्सव आयोजित केला होता. त्या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. ते म्हणाले, देशभरातील एकूण बँकांच्या तुलनेत वीरशैव बँकेला शेड्युल्ड बँकेचा दर्जा मिळणे ही आजच्या घडीला विशेष अभिनंदनाची बाब आहे. कारण कोविड, युक्रेन-रशिया युद्ध, अमेरिका-लढाई अशी विविध कारणांचा प्रत्येक क्षेत्राला परिणाम करणाऱ्या परिस्थितीही वीरशैवची कामगिरी उठावदार अशी आहे. उत्पादन, सेवा आणि शेती अशा तीनही क्षेत्रात देशाची आर्थिक कामगिरी उत्तम आहे. एल निनोचा थोडाफार प्रभाव पडेल. ते म्हणाले, भारतीय गुंतवणूक वाढते आहे. निर्यातही वाढते आहे. ६८० मिलियन डॉलरची गंगाजळी आहे. अर्थव्यवस्थेने गती घेतली आहे. आर्थिक परिस्थिती सुधारते आहे. त्यामुळे नागरी सहकारी बँकांना चांगले दिवस आहेत. पश्चिम महाराष्ट्रामध्ये विशेषता कोल्हापुरात निर्यात वाढते आहे. अशावेळी वीरशैव बँकेला आपले कार्यक्षेत्र विस्तारण्यास अजूनही खूप वाव आहे. नागरी सहकारी बँका देशाच्या विकासात दीर्घकाळ टिकणारे आणि सर्वांना योग्य न्याय देणारे योगदान देऊ शकतात. हत्तरगी मठाचे गुरुसिद्धेश्वर महास्वामी यांनी आशीर्वचन केले. व्यवस्थापक प्रकाश पाटील यांनी प्रास्ताविक केले. अध्यक्ष सतीश घाळी यांनी बँकेच्या आजपर्यंतच्या वाटचालीचा आढावा घेतला. ते म्हणाले, बँकेच्या आजच्या समृद्धीत त्याग, परंपरा दडलेली आहे. बँकेच्या प्रत्येक आजी-माजी घटकाने दिलेल्या योगदानावर आज बँकेला शेड्युल्ड बँकेचा दर्जा मिळाला. ४ फेब्रुवारी १९४२ रोजी एका बँकेवर सुरू झालेला आजचा विस्तार ३१ शाखा, तीन राज्यांपर्यत पोहचला आहे.      बँकेच्या वाटचालीत भरीव योगदान देणारे माजी संचालक नानासाहेब नष्टे,  गणपतराव पाटील, राजेश पाटील चंदूरकर, सूर्यकांत पाटील बुदिहाळकर, महादेव साखरे, डॉ. दिलीप चौगुले, अनिल सोलापुरे, राजेंद्र लकडे, चंद्रकांत स्वामी यांचा सत्कार अध्यक्ष घाळी यांनी केला. यावेळी  संचालक राजेंद्र माळी, श्वेता हत्तरकी, राजशेखर येरटे, विद्या पाटील (चंदुरकर), प्रकाश दतवाडे, शशिकला निल्ले, रवींद्र बनछोडे, अलका स्वामी, संदीप नष्टे, श्रीशैल चौगुले, सिद्धांत पाटील बुदिहाळकर, चेतन देसाई, रोहन लकडे, सुषमा तवटे, अभिजित सोलापूरे, गुरुदेव स्वामी, वरूण पाटील, शंकर मांगलेकर, सुरेश कोळकी यांचा सत्कार सभासदांच्या वतीने करण्यात आला. यावेळी राज्य सहकारी सूत गिरणीचे अध्यक्ष अशोक स्वामी, सुरेश कुराडे, गडहिंग्लजचे नगराध्यक्ष महेश तुरबतमठ, गजानन सुलतानपुरे, सरला पाटील, उपस्थित होते. उपाध्यक्ष वैभव सावर्डेकर यांनी आभार मानले.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes