रविकिरण इंगवलेंचा राजेश क्षीरसागरांच्यावर आरोप, ऋतुराज क्षीरसागरांचा इंगवलेंच्यावर पलटवार
schedule27 Jun 26 person by visibility 157 categoryराजकीय
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : शिवसेना ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख रविकिरण इंगवले यांनी राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष व आमदार राजेश क्षीरसागर यांच्यावर पुन्हा निशाणा साधला. इंगवले यांनी पत्रकार परिषदेत व्हिडीओ दाखवत आमदार क्षीरसागर हे एका कंत्राटदारांकडून चाळीस लाख रुपये मागत आहेत. टक्केवारी मागत असल्याचे सिद्ध होत आहे. टक्केवारीचे बादशहा आहेत. त्यांच्यावर कारवाई व्हावी यासाठी पोलिस प्रशासन व लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार करणार असल्याचे सांगितले. दरम्यान आमदार क्षीरसागर यांचे पुत्र व नगरसेवक ऋतुराज क्षीरसागर यांनी इंगवले यांच्या आरोपावरुन पलटवार केला आहे. ‘रविकिरण इंगवले हे ब्लॅकमेलर आहेत, ते उपद्रवी असून स्वतला खूप शहाणा समजतात. त्यांच्या आरोपाला भीक घालत नाही. कोल्हापूरातील अनेकांना ब्लॅकमेलिंग करण्याचे, गंडा घालण्याचे काम करत आहेत.’ अशा शब्दात ऋतुराज क्षीरसागर यांनी उत्तर दिले आहे. दरम्यान आमदार राजेश क्षीरसागर साहेब हे विधिमंडळ अधिवेशन कामी मुंबईमध्ये आहेत. या प्रकरणासंदर्भात, २८ जून रोजी पत्रकार परिषद घेवून आपली भूमिका जाहीर करणार आहेत.
दरम्यान रविकिरण इंगवले यांनी पत्रकार परिषद घेत आमदार क्षीरसागर यांच्या कार्यपद्धतीवर निशाणा साधला. इंगवले म्हणाले, ‘शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी क्षीरसागर यांना पदे दिली. मात्र सत्तेसाठी त्यांनी पक्षप्रमुख ठाकरे यांची साथ सोडली. डॉक्टर, कंत्राटदारांना टक्केवारीवरुन धमकावून लाखोचे इमले उभे केले आहेत. त्यांनी, अनेक ठिकाणी भ्रष्टाचार केला आहे.जनतेच्या पैशातून त्यांची मिजास सुरू आहे. माझ्या, जिल्हाप्रमुखपदाच्या राजीनामाच्या प्रश्नावर त्यांनी जे छद्मी हास्य केले आहे, ते हास्य डण्यात बदलले नाही तर मी शिवसेनेचा कार्यकर्ता नव्हे. राजकारणा त्यांना निष्प्रभ करणे हीच आपली भूमिका आहे. व्हिडीओद्वारे त्यांच्या टक्केवारीचा पर्दाफाश झाला आहे. मुख्यमंत्र्यांनी, यासंबंधी ठोस भूमिका घेऊन त्यांच्यावर कारवाई करावी. ’
इंगवले यांच्या या टीकेचा नगरसेवक ऋतुराज क्षीरसागर यांनी समाचार घेतला आहे. क्षीरसागर यांनी म्हटले आहे, ‘ ही आमची राजकीय लढाई, राजकारणामध्ये अडथळे येणारच मात्र इंगवले यांनी, सोशल मिडीयाला प्रसारित केलेल्या व्हिडीओ क्लिप सोबत जी ऑडीओ क्लिप प्रसिद्ध केली असून, यामध्ये वापरण्यात आलेल्या अपशब्दांद्वारे बदनामी केली आहे. याविरुद्ध ५ कोटींचा अब्रूनुकसानीचा दावा दाखल करत आहोत. यापूर्वी कॅसिनोमधील व्हिडीओ व्हायरल करण्यापूर्वी पैशाची मागणी करण्यासाठी एका व्यक्तीला इंगवले यांनी आमच्याकडे पाठविले होते. पण आम्ही त्याला भिक घातली नाही. कोल्हापूरातील अनेकांना ब्लॅकमेलिंग करण्याचे, गंडा घालण्याचे काम इंगवले करत आहेत. वास्तविक पाहता हा व्हिडीओ प्रसारित करण्यात आमदार सतेज पाटील यांचाच हात आहे.