विना अनुदानित शाळांच्या टप्पा अनुदान आंदोलनास शैक्षणिक व्यासपीठाचा पाठिंबा
schedule27 Jun 26 person by visibility 40 category
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी : महाराष्ट्र राज्य विनाअनुदानित शाळा समन्वय समितीच्या मुंबई आझाद मैदानावरील टप्पा अनुदान मिळावे यासाठी सुरू असलेल्या आंदोलनास कोल्हापूर जिल्हा शैक्षणिक व्यासपीठाचा पाठिंबा असून बुधवारी १ जुलै रोजी व्यासपीठातंर्गत सर्व संघटनाचे प्रत्येकी दोन प्रतिनिधी तसेच जिल्ह्यातील शंभर टक्के अनुदानित शाळांतील प्रत्येकी दोन प्रतिनिधी आंदोलनात सहभागी होतील, अशी घोषणा शिक्षक आमदार जयंत आसगावकर यांनी कोल्हापूर जिल्हा मुख्याध्यापक संघाच्या विद्याभवन येथे झालेल्या व्यासपीठाच्या तातडीच्या सभेत केली. सभेच्या अध्यक्षस्थानी एस. डी. लाड होते. याप्रसंगी मुख्याध्यापक संघाचे चेअरमन राहुल पवार, सचिव आर. वाय. पाटील, बी जी बोराडे, प्रा. सी. एम. गायकवाड, बाबा पाटील, सुधाकर निर्मळे, राजेश वरक ,एन. आर. भोसले, राजेंद्र कोरे, इरफान अन्सारी, मनोहर जाधव, सुभाष खामकर, के. एस. मगदूम , डी. ए. चौगुले आदी मान्यवर उपस्थित होते.