जिल्हा परिषदेची बुधवारी होणारी सर्वसाधारण सभा रद्द
schedule22 Sep 26 person by visibility 118 categoryजिल्हा परिषद
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी : कोल्हापूर जिल्हा परिषदेची बुधवारी 23 सप्टेंबर 2026 रोजी होणारी सर्वसाधारण सभा रद्द करण्यात आली. पुणे विभागीय शिक्षक व पदवीधर मतदारसंघ निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होऊन आचारसंहिता लागू झाल्याने जिल्हाधिकारी विजय राठोड यांनी सर्वसाधारण सभेला परवानगी नाकारली. जिल्हाधिकारी राठोड यांच्याकडून जिल्हा परिषद प्रशासनाला मंगळवारी सायंकाळी सर्वसाधारण सभेला परवानगी नाकारण्यात आल्याचे पत्र मिळाले. त्यानुसार जिल्हा परिषदेने ही सभा रद्द करण्याचा निर्णय घेतला. जिल्हा परिषद प्रशासनाकडून सायंकाळनंतर जिल्हा परिषदेच्या सदस्यांना फोन करून बुधवारी होणारी सभा रद्द करण्यात आल्याचे कळविले. दरम्यान पुणे विभागीय शिक्षक व पदवीधर मतदारसंघासाठी 23 ऑक्टोंबर रोजी मतदान तर 27 ऑक्टोबर 2026 रोजी मतमोजणी होणार आहे. साधारणपणे ऑक्टोबर महिना अखेरपर्यंत आचारसंहिता लागू असणार आहे. त्यामुळे बुधवारी रद्द करण्यात आलेली जिल्हा परिषदेचे सर्वसाधारण सभा आता नोव्हेंबर महिन्याच्या तिसऱ्या किंवा चौथ्या आठवड्यात होण्याची शक्यता आहे.