जिप पदाधिकाऱ्यांची कर्मचारी सोसायटीला भेट, कामकाजाचे केले कौतुक !
schedule22 Sep 26 person by visibility 112 categoryजिल्हा परिषद
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी : कोल्हापूर जिल्हा परिषद कर्मचारी सोसायटीला जिल्हा परिषद अध्यक्ष शिल्पा शशिकांत खोत, उपाध्यक्ष तानाजी पाटील, बांधकाम समिती सभापती सारिका नांदेकर, शिक्षण समिती सभापती शितल प्रवीण यादव , समाज कल्याण समिती सभापती श्रद्धा अविनाश गायकवाड व महिला बालकल्याण समिती सभापती विद्या विलास पाटील यांनी सदिच्छा भेट दिली. संस्थेबद्दलची माहिती चेअरमन संजय शिंदे, संचालक अजय शिंदे, रणजित पाटील व उत्तम वावरे यांनी दिली. पदाधिकाऱ्यांनी माहिती ऐकून संस्थेच्या कामकाजाबद्दल समाधान व्यक्त केले. तसेच त्यांनी अभ्यासिकेला भेट देऊन उपक्रमाचे कौतुक केले आणि सभासदांच्या मुलांनी त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.