Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
जिप पदाधिकाऱ्यांची कर्मचारी सोसायटीला भेट, कामकाजाचे केले कौतुक ! जिल्हा परिषदेची बुधवारी होणारी सर्वसाधारण सभा रद्दशिक्षक -पदवीधर मतदारसंघाचा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर, 23 ऑक्टोबरला मतदानपुणे पदवीधर- शिक्षकसाठी महायुतीतील पक्षांची वाटचाल स्वतंत्रपणे लढण्याकडे ! मंत्र्यांच्या विधानांनी मैत्रीपूर्ण लढतीचे चिन्हे अधिक !!कोल्हापुरात रंगणार ‘मराठी चित्रपटगीत महोत्सव, रसिकांसाठी प्रवेश विनामूल्यइंग्लिश मीडियम स्कूल असोसिएशनतर्फे गुरुवारी राज्यस्तरीय शिक्षक सन्मान सोहळापशुधनासाठी विमा योजना, पशुपालकांकडून ऑनलाइन अर्ज मागविण्याच्या प्रक्रियेला प्रारंभप्राधिकरणच्या सीईओंच्या कामकाजाची चौकशी करा,  आमदार राजेश क्षीरसागर यांचे मुख्य सचिवांना पत्रमहायुतीच्या प्रचाराचा शुभारंभ 24 सप्टेंबरला ! आठ ऑक्टोबरला पॅनेलची घोषणा, अदृश्य शक्ती लुप्त झाली !!गोकुळच्या संचालक पदासाठी आमदारही मैदानात, अशोक माने यांचा अर्ज दाखल

जाहिरात

 

पुणे पदवीधर- शिक्षकसाठी महायुतीतील पक्षांची वाटचाल स्वतंत्रपणे लढण्याकडे ! मंत्र्यांच्या विधानांनी मैत्रीपूर्ण लढतीचे चिन्हे अधिक !!

schedule22 Sep 26 person by visibility 213 categoryराजकीय

आप्पासाहेब माळी, महाराष्ट्र न्यूज वन : ‘पुणे पदवीधर- शिक्षक’मतदारसंघाची निवडणूक महायुती म्हणून लढविणार असे राज्यात सत्तेत सहभागी घटक पक्षातील नेते मंडळी व मंत्री एका सुरात म्हणतात. मात्र त्याचवेळी स्वतंत्रपणे मेळावे, संपर्क दौरे काढत आपल्याच पक्षाचा उमेदवार आमदार होणार म्हणत आहेत. गेल्या काही दिवसातील मंत्री जयकुमार गोरे, मंत्री चंद्रकांत पाटील, मंत्री हसन मुश्रीफ यांची विधाने पाहता पुणे पदवीधर- शिक्षक मतदारसंघात महायुतीतील घटक पक्षाची वाटचाल स्वतंत्रपणे लढण्याकडे दिसत आहे. यामुळे या दोन्ही मतदारसंघासाठी महायुती एकत्र लढणार की मैत्रीपूर्ण लढतीसाठी शड्डू ठोकणार याची चर्चा रंगली आहे. महायुतीतील तीनही पक्षातील इच्छुक उमेदवारांनी निवडणुकीसाठी पायाला भिंगरी बांधले आहेत.

पुणे विभागीय शिक्षक मतदारसंघात भाजपकडून कौस्तुभ गावडे यांचे नाव सर्वाधिक चर्चेत आहे. याशिवाय पंढरपूर येथील प्रा. बी. पी. रोंगे हे सुद्धा भाजपकडून इच्छुक आहेत. महाराष्ट्र राज्य शाळा कृती समितीचे प्रमुख व माजी आमदार दत्तायत्र सावंत यांनी निवडणुकीची जय्य तयारी केली आहे.त्यांनीही पंढरपूर येथील शिक्षक मेळाव्यात भाजपकडून लढायचे की अपक्ष यासंबंधी कानोसा घेतला. याव्यतिरिकत शिवसेनेकडून, वैद्यकीय कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे हे तयारी करत आहेत. ते, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निकटवर्तीय आहेत. त्यांनीही पक्षाचे मंत्री, आमदार यांच्या उपस्थितीत शिक्षक सन्मान सोहळे आयोजित करुन उमेदवारीसाठी दावा प्रबळ करत आहेत. उद्योगमंत्री उदय सामंत यांचे ओएसडी प्रा. सचिन सानप यांनी शिक्षक मतदारसंघातून लढायचे म्हणून जिल्हानिहाय दौरे करत आहेत. हे दोघे शिवसेनेचे आहेत. इच्छुकांची संख्या आणि निवडणुकीची तयारी यावर नजर टाकली तर महायुतीमध्ये शिक्षक मतदारसंघासाठी एकवाक्यता निर्माण होण्याची शक्यता कमी दिसत आहे.यामुळे महायुतीमध्ये मैत्रीपूर्ण लढतीची चिन्हे दिसत आहेत. यामध्ये भरीस भर म्हणजे गेल्या काही दिवसात महायुतीतील नेतेमंडळीची विधाने ही स्वतंत्रपणे लढण्याचे मार्ग दर्शविणारी आहेत.

मंत्री गोरे यांनी, नुकतेच पंढरपूर येथे बोलताना ‘पुणे विभागीय शिक्षक व पदवीधरची निवडणूक महायुती म्हणून लढविण्याचा आमचा प्रयत्न आहे. वेळ पडल्यास या दोन्ही मतदारसंघातील निवडणुकीला सामोरे जाऊ’असे म्हटले आहे. ऑगस्टच्या पहिल्या आठवडयात मंत्री चंद्रकांत पाटील यांनी इचलकरंजी येथे मेळावा घेतला. या मेळाव्यात त्यांनी, ‘पुणे विभागातील शिक्षक व पदवीधर मतदारसंघ हे भाजपाचे परंपरागत मतदारसंघ आहेत.’असे स्ष्ट केले.कोेल्हापूरचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी, मंगेश चिवटे यांना शिक्षक मतदारसंघातून महायुतीकडून उमेदवारी मिळावी यासाठी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांची भेट घेऊन प्रयत्न करू असा सावध पवित्रा घेतला आहे. राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ यांनी कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक भैया माने यांना पदवीधर मतदारसंघातून आमदार करणारच असा शडडू ठोकला आहे. सांगलीत मेळावा घेऊन त्यांनी राष्ट्रवादीचे आमदार अरुण लाड यांना आवाहन करताना शरद लाड यांना निवडणुकीपासून थांबविण्याचे आवाहन केले. दरम्यान पदवीधर मतदारसंघात भाजपकडून उमेदवारी या सूत्रावरच शरद लाड यांचा पक्ष प्रवेश घडवून आणल्याचे सांगितले जाते. दुसरीकडे भाजपकडून पदवीधर मित्र संघटनेचे माणिक पाटील चुयेकर हे गेली अनेक वर्षे प्रतिक्षेत आहेत. मंत्री पाटील यांच्यासाठी त्यांनी एकदा उमेदवारी मागे घेतली होती. न्याय मिळेल, हा आशावाद त्यांना आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes