Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
निर्माता गटात आठ, दिग्दर्शक गटातून नऊ उमेदवार ! अभिनेता गटात पाच जणांमध्ये लढत ! !केआयटीच्यावतीने नूतन कुलगुरू आर के कामत यांचे स्वागत डीवायपी पॉलिटेक्निकचा  योगेश घुले ठरला गुगल स्टुडन्ट अँबेसिडर केएमटीतील रोजंदारी - अनुकंपा कर्मचाऱ्यांना कायम सेवेत सामावून घ्या : सभापती सत्यजित जाधव चित्रपट महामंडळाच्या निवडणुकीतून 13 जणांची माघार ! तीन जागा बिनविरोध होणार!! डॉ. सुनेत्रा शिराळे यांना आरोग्य विद्यापीठाची पीएचडीकोल्हापूर महापालिकेला मिळणाऱ्या जीएसटी अनुदानात वाढ कराआयटी पार्कची जागा एमआयडीसीच्या ताब्यात, आमदार राजेश क्षीरसागरांचा पाठपुरावाचित्रपट महामंडळाच्या निवडणुकीसाठी मतदान केंद्राची संख्या वाढवावी - मेघराज राजेभोसलेकृष्णराज महाडिकांनी घेतली पोलिस महासंचालकांची भेट, महत्वपूर्ण विषयासंबंधी निवेदन सादर

जाहिरात

 

डीवायपी पॉलिटेक्निकचा  योगेश घुले ठरला गुगल स्टुडन्ट अँबेसिडर

schedule28 May 26 person by visibility 31 categoryशैक्षणिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी :  कसबा बावडा येथील डॉ. डी. वाय.पाटील पॉलिटेक्निकचा विद्यार्थी योगेश परमेश्वर घुले याची 'गुगल स्टुडन्ट अँबेसिडर  २०२६' म्हणून निवड झाली आहे.विशेष म्हणजे कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व पॅलिटेक्निकमधून असा बहुमान मिळवणारा तो पहिला विद्यार्थी ठरला आहे.  डी.वाय.पाटील ग्रुपचे विश्वस्त ऋतुराज पाटील यांच्या हस्ते त्याचा सत्कार करण्यात आला. यावेळी कार्यकारी संचालक डॉ. ए.के. गुप्ता,  प्राचार्य डॉ. महादेव नरके उपस्थित होते.

यावेळी विश्वस्त ऋतुराज पाटील यांनी  पॉलिटेक्निकमध्ये शिक्षण घेताना एवढ्या कमी वयात  'गुगल स्टुडन्ट अँबेसिडर' म्हणून योगेशने मिळवलेला सन्मान कौतुकास्पद असल्याचे सांगून योगेशच्या भविष्यातील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

डॉ.गुप्ता यांनी विद्यार्थ्यांच्या शिक्षणासह सर्वांगीण विकासासाठी डी वाय पाटील ग्रुप कटिबध्द असल्याचे नमूद केले. प्राचार्य डॉ.नरके यांनी हा सन्मान पॉलिटेक्निकसाठी अभिमानाचा क्षण असल्याची भावना व्यक्त केली.योगेश हा मूळचा माळशिरस येथील असून सध्या पॉलिटेक्निकच्या कम्प्युटर इंजिनिअरिंगच्या दुसऱ्या वर्षात शिकत आहे.त्याने गुगलकडे याबाबत ऑनलाईन रजिस्टर केले होते. ॲप्टिट्यूड टेस्ट, ऑनलाइन इंटरव्ह्यू, विषयाचे ऑनलाईन प्रेझेन्टेशन या सर्व गोष्टी त्याने यशस्वीरीत्या पूर्ण केल्या. येणाऱ्या  वर्षभरात तो इतर विद्यार्थ्यांना गुगल जेमिनी एआय बाबत ऑनलाईन पद्धतीने मार्गदर्शन करणार आहे. आईवडिलांनी मोठ्या कष्टाने शिक्षण दिल्याने काहीतरी वेगळे करावे अशी इच्छा होती. यातूनच हे यश मिळाल्याचे  योगेशने सांगितले.यावेळी कॉम्प्युटर इंजिनिअरिंग विभागप्रमुख डॉ. प्रकाश शिंदे,  कॉम्प्युटर सायन्स विभाग प्रमुख शीतल साळोखे, सत्यजित रोकडे आदी उपस्थित होते.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes