चित्रपट महामंडळाच्या निवडणुकीतून 13 जणांची माघार ! तीन जागा बिनविरोध होणार!!
schedule28 May 26 person by visibility 223 categoryलाइफस्टाइल
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी : अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या निवडणुकीतून उमेदवारी अर्ज माघारीच्या दिवशी 13 जणांनी अर्ज मागे घेतले. 17 जागेसाठी एकूण 60 जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. तीन जागेसाठी प्रत्येकी एक - एक अर्ज दाखल झाल्यामुळे त्यापैकी आता 47 उमेदवार रिंगणात राहिले आहेत.
उमेदवारी अर्ज माघार घेणाऱ्यांमध्ये कला दिग्दर्शन गटातून अमर मोरे, छायाचित्रण गटातून बाबा लाड, निर्माता व अभिनेता गटातून आकाराम पाटील, कामगार गटातून बाळकृष्ण बारामती, निर्माता गटातून गणेश शिंदे, अभिनेता गटातून धर्मेंद्र यादव, दिग्दर्शन गटातून अर्जुन नलवडे, अभिनेता गटातून महादेव साळोखे, अभिनेता गटातून सुभाष गुदेशा, अभिनेता गटातून प्रदीप कोतमिरे, कला दिग्दर्शन गटातून श्याम लोंढे, अभिनेत्री गटातून नीलम शिर्के यांनी उमेदवारी अर्ज माघार घेतली आहे. दरम्यान अभिनेत्री गटातून नीलम शिर्के यांची उमेदवारी माघार झाल्यामुळे या गटामध्ये अभिनेत्री वर्षा उसगावकर यांची बिनविरोध निवडीची केवळ औपचारिकता राहिली आहे. संकलन गटातून विजय खोचीकर व गायक - संगीत गटातून आनंद शिंदे शिंदे या दोघांचे प्रत्येकी एक - एक अर्ज दाखल झाल्यामुळे या दोन्ही गटातील बिनविरोध निवडीची औपचारिकता राहिली आहे. 26 ते 28 मे या कालावधीत उमेदवारी अर्ज माघारीचा कालावधी होता. गुरुवारी 28 मे 2026 रोजी दुपारी तीन वाजेपर्यंत अर्ज माघारीची मुदत होती. वेगवेगळ्या गटातील निवडणुका बिनविरोध हव्यात यासाठी प्रयत्न झाले. तीन गटांमध्ये यश आले. तर 14 गटामध्ये निवडणुका होणार आहेत. उमेदवारी अर्ज माघारीच्या दिवशी संबंधितांनी निवडणूक अधिकारी रागिणी खडके यांच्याकडे उमेदवारी माघारीचे अर्ज सादर केले. अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाची निवडणूक दहा वर्षांनी होत आहे. 3403 इतके सभासद आहेत. सात जून 2026 रोजी मतदान आहे. तर 8 जून रोजी मतमोजणी होणार आहे.