Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
कोल्हापूर महापालिकेला मिळणाऱ्या जीएसटी अनुदानात वाढ कराआयटी पार्कची जागा एमआयडीसीच्या ताब्यात, आमदार राजेश क्षीरसागरांचा पाठपुरावाचित्रपट महामंडळाच्या निवडणुकीसाठी मतदान केंद्राची संख्या वाढवावी - मेघराज राजेभोसलेकृष्णराज महाडिकांनी घेतली पोलिस महासंचालकांची भेट, महत्वपूर्ण विषयासंबंधी निवेदन सादरशिक्षक - कर्मचाऱ्यांना पूर्वीचीच वैद्यकीय प्रतिपूर्ती योजना  चालू ठेवा सतेज पाटलांनी काय करावे हा त्यांचा प्रश्न, आम्ही महायुती म्हणून गोकुळची निवडणूक लढविणार - हसन मुश्रीफशिवराज्याभिषेकदिनानिमित्त विविध सामाजिक उपक्रम ! व्याख्यानमाला, मिरवणुकीचे आयोजन !!अण्णासाहेब पाटील महामंडळला हजार कोटींचा निधी द्या, अन्यथा हलगी बजाव आंदोलनलिंगायत माळी समाजातर्फे तेरा जूनला विद्यार्थी गुणगौरव, पुरस्कार वितरण समारंभ शिक्षकांच्या प्रश्नांची आठ दिवसात सोडवणूक करा, अन्यथा जिल्हा परिषदेसमोर साखळी उपोषण

जाहिरात

 

कोल्हापूर महापालिकेला मिळणाऱ्या जीएसटी अनुदानात वाढ करा

schedule27 May 26 person by visibility 26 categoryमहानगरपालिका

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : आमदार अमल महाडिक यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुंबई येथे भेट घेत कोल्हापूर शहराशी निगडित विविध प्रश्नांसंदर्भात निवेदन दिले. त्यामध्ये प्रामुख्याने कोल्हापूर महानगरपालिकेला जीएसटीच्या बदल्यात मिळणाऱ्या सहाय्यक अनुदानात वाढ करण्याची मागणी केली. कोल्हापूर महानगरपालिकेकडे जकात कर प्रणाली सुरू असताना सुरू असताना उत्पन्नामध्ये दरवर्षी सरासरी १६ ते १७ टक्के वाढ होत होती. सरकारने २०१७-१८ पासून दरवर्षी केवळ ८ टक्के नैसर्गिक वाढीने सहाय्यक अनुदान उपलब्ध करून दिले आहे. कोल्हापूर महानगरपालिकेच्या कर्मचा-यांच्या महागाई भत्ता, नियमित वेतनवाढ यामध्ये ११ टक्के इतकी नियमित वाढ होत आहे. याबरोबरच पाणी पुरवठा, मल, जल निसारण, पथदिवे याकरीताच्या विद्युत देयकात महावितरणकडून सन २०१७-१८ पासून प्रतिवर्षी सरासरी १० ते १५ टक्के वाढ झालेली आहे. म्हणजेच महानगरपालिकेच्या खर्चात प्रतिवर्षी १० ते १५ टक्के वाढ होत असताना शासनाकडून मिळणा-या सहाय्यक अनुदानात केवळ ८ टक्के नैसर्गिक वाढ देण्यात येत आहे. याकडे आमदार महाडिक यांनी मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधले. कोल्हापूर महापालिकेस सरकारकडून प्राप्त होणा-या सहाय्यक अनुदानात २०२५-२६ पासून प्रतिमाह १२ टक्के प्रमाणे नैसर्गिक वाढ करणेत यावी तसेच सन २०१७-१८ पासून १२ टक्के प्रमाणे होणारी फरकाची २७५.५२ कोटी रुपये इतकी रक्कम सरकारकडून तातडीने उपलब्ध व्हावी अशी मागणी केली.
 

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes